ETV Bharat / bharat

चंद्रयान 3 देशाचा गौरव, सोनिया गांधींचे इस्रो प्रमुखांना अभिनंदन पत्र

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 5:19 PM IST

इस्रोच्या चंद्रयान-३ च्या यशस्वी 'लँडिंग'मुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी पत्र लिहून इस्रो प्रमुखांचे अभिनंदन केले आहे. चंद्रयान-३ च्या यशस्वी 'लँडिंग'नंतर देशभरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Sonia Gandhi And ISRO chief
Sonia Gandhi And ISRO chief

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी गुरुवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना पत्र लिहिले आहे. गांधी यांनी चंद्रयान-3 च्या यशस्वी 'लँडिंग'बद्दल त्यांचे पत्रातून अभिनंदन केले आहे. सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, या अद्भुत कामगिरीचं सर्वांनी कौतुक केलं आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. अंतराळ क्षेत्रात देशानं नवा इतिहास रचलाय. इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 'विक्रम' आणि रोव्हर 'प्रज्ञान' या लँडरचं सॉफ्ट लँडिंग केलं. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०४ मिनिटांनी चंद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला.

सोनिया गांधी यांनी सोमनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'मला तुम्हाला सांगायचं की, काल संध्याकाळी इस्रोनं मिळवलेल्या अद्भूत कामगिरीमुळे मी खूप आनंदी आहे. ही सर्व भारतीयांसाठी, विशेषतः तरुणांसाठी गौरव अभिमानाची आणि उत्साहाची बाब आहे.

इस्रोच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन : सोनिया गांधी यांनी पुढे पत्रात लिहलं आहे की, 'इस्रोच्या उत्कृष्ट क्षमता गेल्या अनेक दशकांमध्ये निर्माण झाल्या आहेत. इस्रोकडे नेहमीच उत्कृष्ट शास्त्रज्ञ राहिले आहेत. इस्रोने नेहमीच देशाला पुढे नेले आहे. 'सोनिया गांधींच्या मते, 'इस्रो 1960 पासून स्वावलंबनाच्या आधारावर पुढे काम करत आहे. त्यामुळे देशातच्या प्रगतीत इस्रोचे योगदान महत्वपूर्ण आहे.'या निमित्ताने 'मी' इस्रोच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन करते.

लँडिंग'मुळे देशात जल्लोष : इस्रोच्या चंद्रयान-३ च्या यशस्वी 'लँडिंग'मुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. भारताला हा अभिमानाचा क्षण दिल्याबद्दल देशातील अनेक मोठे राजकारणी इस्रोच्या शास्त्रज्ञाचे अभिनंदन करत आहेत. यातच सोनिया गांधी यांनी इस्रोच्या प्रमुख एस. सोमनाथ यांना पत्र लिहिलं असून प्रत्येक भारतीय आनंदी असल्याचं सांगितलं आहे. तसेच इस्रोचे योगदान देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचं असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

  • CPP Chairperson Smt. Sonia Gandhi Ji extends her heartfelt congratulations to the dedicated team at ISRO.

    Here is her letter to the Chairman of ISRO, Shri S. Somanath. pic.twitter.com/olCRnO1EqY

    — Congress (@INCIndia) August 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 : चंद्रयान 3 मधून रोव्हरच ' मुनवॉक' सुरू , चंद्रावरील मातीत उमटवित आहेत ठसे
  2. Aditya L1 Mission News : चंद्रानंतर भारताची लवकरच सुर्यावर स्वारी, इस्रोच्या अध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती
  3. Chandrayaan-3 : जवाहरलाल नेहरूंच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमुळे शक्य: चंद्रयान मोहिमेवर काँग्रेसची प्रतिक्रिया
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.