महाराष्ट्र

maharashtra

स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 84 वर्षीय व्यक्तीला 9.40 कोटींचा गंडा; बँकेच्या माजी अधिकाऱ्याला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 8:54 PM IST

Mumbai Crime News : मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. एका 84 वर्षीय व्यक्तीची स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल 9.40 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बँकेच्या माजी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

Mumbai Fraud News
मुंबईत 85 वर्षीय व्यक्तीची 9.40 कोटींची फसवणूक

मुंबई Mumbai Crime News :स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून एका 84 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 9 कोटी 40 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका बँकेच्या माजी अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक भोसले यांनी दिली आहे. अटक केलेल्या आरोपीचं नाव रवी शर्मा (वय 40) असं आहे. रवी शर्मा हा एका बँकेचा माजी रिलेशनशिप मॅनेजर होता. सदरील प्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता आरोपीला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसंच या प्रकरणी ध्वनिक भट नामक आरोपीचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण : पेडर रोड येथे राहणाऱ्या वासुदेव हरिराम वलेचा (वय 84) यांची 9 करोड 40 लाख दहा हजार 985 रुपयांना फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वासुदेव वलेचा यांची कन्या मोनिका यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मोनिका यांचे वडील वासुदेव यांचा पूर्वी कपड्याचा व्यवसाय होता. वय झाल्यानंतर वासुदेव यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला. वासुदेव वलेचा हे पत्नी शांती वलेचा आणि तिन्ही मुलींचे बँक खाते स्वतः हँडल करत होते. मात्र, वय झाल्यामुळं त्यांनी 2019 मध्ये त्यांनी सर्वांचे बँक खाते हँडल करण्याची जबाबदारी रवी शर्मा नावाच्या बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरला दिली.



आरोपींवर गुन्हा दाखल :रवी शर्मावर पूर्ण विश्वास बसल्यामुळं वासुदेव वलेचा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यासाठी त्याच्याकडं पैसे दिले. त्यानंतर शर्मा यानं वासुदेव आणि त्यांची पत्नी शांती यांना तुमचे पैसे चार पट वाढले असून अजून पैसे गुंतवणूक करा, अशी बतावणी केली. वासुदेव वलेचा यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून जवळपास दहा कोटींची रक्कम 2019 ते 2024 दरम्यान ट्रान्सफर केली. 12 जानेवारीला वासुदेव आणि त्यांची पत्नी शांती यांची तब्येत बरी नसल्यानं त्यांची मुलगी मोनिका औषध आणण्यासाठी भाटिया रुग्णालयात केली. तेथे क्रेडिट कार्ड स्वाईप करून एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता बँक बॅलन्स नसल्यामुळं हा व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यावेळी मोनिकानं रवी शर्माला ताबडतोब फोन केला. यावेळी काहीतरी गडबड असल्याची मोनिकाला जाणीव झाली. त्यानंतर तिने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी रवी शर्मा आणि फरार आरोपी ध्वनीक भट यांच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 409, 420, 465, 467, 468, 471 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. हिरेन भगतच्या पोलीस कोठडीत वाढ; कर्नाटक बँकेत पोलिसांना सापडलं घबाड, कोर्टात केला 'हा' दावा
  2. कर्ज घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे फायनान्स कंपनीची फसवणूक, 'असा' प्रकार आला उघडकीस
  3. कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक; अनेक मोठे मासे अडकणार?

ABOUT THE AUTHOR

...view details