महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद, पोलीस अन् राणा समर्थकांमध्ये जुंपली

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 7:42 AM IST

Updated : Feb 20, 2024, 7:47 AM IST

Amravati Shivaji Maharaj Statue : अमरावतीत शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पोलीस आणि राणा समर्थकांमध्ये वाद झाला. प्रशासनानं दोन वर्षांपूर्वी महाराजांचा अनधिकृत पुतळा हटवला होता.

Amravati Shivaji Maharaj Statue
Amravati Shivaji Maharaj Statue

जितू दुधाने

अमरावती : अमरावती शहरात दरवर्षी शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी केली जाते. मात्र यंदा या उत्सवाला गालबोट लागलं. येथील राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी प्रशासनाला न जुमानता शिवजयंती साजरी केली. त्यामुळे वाद निर्माण झाला.

राणा समर्थक-पोलिसांमध्ये बाचाबाची : शिवजयंती निमित्त राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार, अशी भूमिका राणा समर्थकांनी घेतली होती. त्यामुळे या परिसरात रात्रीपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी बांधलेल्या उंच ओट्याची पूजा करण्याचा राणा समर्थकांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं.

काय आहे वाद : आमदार रवी राणा यांनी दोन वर्षांपूर्वी या उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र हा पुतळा अनधिकृत असल्यानं महानगरपालिकेनं त्यावर कारवाई करत तो काढून टाकला. काल शिवजयंती निमित्त तेथील उंच ओट्यावर शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा ठेवून पूजा करण्याचा प्रयत्न युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. या दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

परवानगी घेऊन पुतळा उभारणार : "2022 मध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा जो पुतळा बसवला होता, तो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं काढून टाकला. जिथे महाराजांचा पुतळा होता, तिथे आम्ही मानाचा मुजरा करण्यासाठी आलो होतो. मात्र पोलिसांनी आम्हाला अडवलं. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही या ठिकाणी रीतसर परवानगी घेऊन महाराजांचा पुतळा स्थापित करणार", अशी माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते जितू दुधाने यांनी दिली.

हे वाचलंत का :

  1. दोन वर्षानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद; राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा बंदोबस्त
Last Updated : Feb 20, 2024, 7:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details