महाराष्ट्र

maharashtra

सामना संपताच कर्नाटकच्या क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 9:01 PM IST

Karnataka cricketer Hoysala K dies : कर्नाटकचा क्रिकेटपटू के. होयसालाचं निधन झालं आहे. क्रिकेटचा सामना खेळल्यानंतर मैदानावर अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानं होयसालाचा मृत्यू झाला.

Karnataka cricketer Hoysala K dies
सामना संपताच कर्नाटकच्या क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

बंगळुरु :Karnataka cricketer Hoysala K dies : कर्नाटकचा क्रिकेटपटू होयसाला के (वय 34) याचं काल गुरुवार (दि. 23 फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ही घटना बंगळुरूमधील एजिस साऊथ झोन स्पर्धेदरम्यान घडली. क्रिकेट खेळत असताना होयसाला कोसळला. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घडलेल्या घटनेची माहिती : बंगळुरू येथील आरएसआय मैदानावर आयोजित एजिस दक्षिण विभाग स्पर्धेतील सामन्यात होयसाला गुरुवारी तामिळनाडूविरुद्ध खेळला. रोमहर्षक सामना जिंकल्यानंतर, संघासह डिनरला जाण्यापूर्वी होयसाला अचानक जमिनीवर कोसळला. मैदानावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तत्काळ तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानं उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्याला ताबडतोब ॲम्ब्युलन्सने बंगळुरूच्या बोअरिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात नेत असताना कुटुंबीयांनाही घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली होती.

कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व केलं : होयसालाला रुग्णालयात फार लवकर दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू करण्याअगोदरच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वास दु:खद वातावरण आहे. बोरिंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी होयसाला याला तपासलं. परंतु, त्याचा मृत्यू काही वेळापुर्वीच झाल्याचं त्यांनी सांगितलं. मधल्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाज, होयसाला यांनं 25 वर्षांखालील गटात कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व केलं. तो कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही खेळला होता.

1 जानेवारीला घडली होती घटना : खरगोन जिल्ह्यातील एका गावात क्रिकेट सामना खेळत असताना एका 22 वर्षीय खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला. यात त्याचा मृत्यू झाला. खरगोन जिल्ह्यातील बलवारा पोलीस स्टेशन हद्दीतील कटकूट गावात ही घटना घडली होती. एका सामन्यात इंदलसिंग जाधव बंजारा नावाच्या व्यक्तीला गोलंदाजी करताना अस्वस्थ वाटलं. यानंतर इंदल सिंग यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषीत करण्यात आलं.

ABOUT THE AUTHOR

...view details