महाराष्ट्र

maharashtra

दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी पदाचा दिला राजीनामा, काय केले आरोप? - Arvinder Singh Lovely resigns

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 6:22 PM IST

Arvinder Singh Lovely resigns : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Arvinder Singh Lovely resigns
Arvinder Singh Lovely resigns

नवी दिल्लीArvinder Singh Lovely resigns : लोकसभा निवडणूक सुरू असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्यानं लवली यांनी हे पद सोडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी राजीनाम्याचं कारणही दिलं आहे. ज्या पक्षाच्या (आप) विरोधात काँग्रेस होती, त्या पक्षाशी लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी केल्याचं म्हटलं आहे.

दीपक बाबरिया यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी : काँग्रेस प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्या कार्यपद्धतीवर नेत्यांनी आक्षेप घेत, नाराजी व्यक्त केलीय आहे. लवलीच्या म्हणण्यानुसार बाबरियांविरोधात असलेल्या नेत्यांची हकालपट्टी करण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आहे. त्यामुळंच मी राजीनामा देत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. लवलीनं राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, 'मी हे पत्र अतिशय जड अंतःकरणानं लिहित आहे. मला पक्षात पूर्णपणे असहाय्य वाटत आहे. त्यामुळं मी आता दिल्ली अध्यक्षपदावर राहू शकत नाहीत. दिल्लीचे प्रभारी दीपक बाबरिया तसंच दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेले सर्व निर्णय एकतर्फी आहेत. मला दिल्लीचा पक्षप्रमुख बनवल्यापासून मला वरिष्ठ पदावर कोणाचीही नियुक्ती करण्याची परवानगी नाही."

प्रभारी नियुक्त करण्यास परवानगी नाही :अरविंदर सिंग लवली यांनी पत्रात लिहिलं आहे की, "मी अनुभवी नेत्याची मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती करण्याची विनंती केली होती. पण दिल्ली प्रभारींनी ती फेटाळून लावली. दिल्ली प्रभारींनी आजपर्यंत ब्लॉक प्रभारी नियुक्त करण्याची परवानगीही दिलेली नाही. त्यामुळं दिल्लीतील 150 ब्लॉकमध्ये आतापर्यंत प्रभारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत."

पक्षाच्या प्रत्येक निर्णयाचा आदर :'दिल्ली काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून आम आदमी पक्षानं सरकार स्थापन केल. त्याविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते होते. आपचे अर्धे कॅबिनेट मंत्री सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. यानंतरही पक्षानं दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पक्षाच्या अंतिम निर्णयाचा आम्ही आदर केला. मी केवळ या निर्णयाचं जाहीर समर्थन केलं. पक्षाच्या आदेशानुसार राज्य युनिट कार्य करेल याचीही खात्री केली. दिल्ली प्रभारींच्या सूचनेनुसार, अटकेच्या रात्री मी सुभाष चोप्रा आणि संदीप दीक्षित यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्या घरीही गेलो होतो. तथापि, या विषयावर माझं मत पूर्णपणं भिन्न होतं."

निवडणुकीतून माघार : "दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युती केल्यानंतर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत लढण्यासाठी 3 संसदीय जागा मिळाल्या. कमी जागा मिळाल्याचं समजताच पक्षाच्या हिताचा विचार करून इतर ज्येष्ठ नेत्यांना तिकीट दिल्याची खात्री केली. मी जाहीरपणे माझं नाव मागे घेतलं. तसंच संभाव्य उमेदवार म्हणून विचार करण्यास नकार दिला. सर्व निरीक्षक आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, या 3 जागांपैकी उत्तर-पश्चिम दिल्ली आणि ईशान्य दिल्लीच्या जागा 2 उमेदवारांना देण्यात आल्या," असा दावा अरविंदर सिंग लवली केला.

हे वाचलंत का :

  1. कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवन्ना अडचणीत एसआयटी स्थापण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांचे आदेश - Prajwal Revanna obscene video case
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्स मैदानावर 29 एप्रिलला 'महाविजय संकल्प सभा', बारामतीसह तीन लोकसभेत महायुतीचं कमळ फुलणार का? - Lok Sabha Election 2024
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेसकोर्स मैदानावर 29 एप्रिलला 'महाविजय संकल्प सभा', बारामतीसह तीन लोकसभेत महायुतीचं कमळ फुलणार का? - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details