ETV Bharat / bharat

कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवन्ना अडचणीत एसआयटी स्थापण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्यांचे आदेश - Prajwal Revanna obscene video case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 4:52 PM IST

MP Prajwal Revanna obscene video case
MP Prajwal Revanna obscene video case

MP Prajwal Revanna obscene video case : कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना हे कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी दिले आहेत.

बंगळुरू MP Prajwal Revanna obscene video case : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हसन जिल्ह्यातील एका कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कथित अश्लील व्हिडिओ होणार तपास : "सरकारनं प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप फिरत आहेत. त्यात महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं दिसून येतंय. SIT तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकरणात एसआयटी तपास करण्यासाठी सरकारला पत्र लिहिलं होते. त्यांच्या विनंतीला मान देत राज्य कर्नाटक सरकारनं एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया X या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे .

महिला आयोगाच्या विनंतीनंतर निर्णय : यापूर्वी 25 एप्रिल रोजी, सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सिद्धरामैय्या यांना एसआयटी चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यांनंतर कर्नाटक सरकारनं एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 25 एप्रिल रोजी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सिद्धरामय्या यांना SIT तपास सुरू करण्याची विनंती केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, महिला आयोगानं यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तसंच गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

भाजपाचा संबंध नाही : हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकणात भाजपाचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे राज्य युनिटचे मुख्य प्रवक्ते एस. प्रकाश म्हणाले की, "आमच्या पक्षाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही." कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले, "मी असो किंवा एचडी देवेगौडा, आम्ही नेहमीच महिलांचा आदर करतो. जेव्हा, जेव्हा त्या तक्रारी घेऊन येतात, तेव्हा आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे." मुख्यमंत्र्यांनी आधीच आदेश दिले आहेत. याप्रकरणी एसआयटी चौकशी तसंच तपास सुरू झाला आहे.

हे वाचलंत का :

  1. Kirit Somaiya Video Case : किरीट सोमय्या कथित अश्लील व्हिडिओ प्रकरण; मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हे शाखेकडून तपास सुरू
  2. Kirit Somaiya Video Case : किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओची होणार सखोल चौकशी - देवेंद्र फडणवीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.