मुंबई - Riteish Genelia New Reel : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे फक्त चित्रपटसृष्टीतीलच नव्हे तर सोशल मीडियावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा त्यांच्या मजेदार रिल्सनं चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत असतात. अलीकडेच या जोडप्यानं एक मजेदार रील बनवला आहे. आता या रिलवर चाहत्यांसह सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. जेनेलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा रिल शेअर केला आहे. रिलची सुरुवात रितेशपासून होते. यामध्ये तो 1997 च्या रोमँटिक-कॉम 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी' मधील जुही चावलाच्या 'अकेला है मिस्टर खिलाडी' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख शेअर केला रिल :यानंतर या रिलमध्ये जेव्हा जेनेलिया येते, तेव्हा ती एका हुशार पत्नीची भूमिका करते. रितेशचे गाणे बीवी नंबर 1 मध्ये बदलते. तिच्या पतीला त्यावर रील बनवण्यास सांगते. हा रिल शेअर करत जेनेलियानं लिहिलं, "सामान्य नवरा रितेशबरोबर बीबी नंबर 1." 'मिस्टर अॅन्ड मिसेस खिलाडी' अभिनेत्री जुही चावलानेही या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं कमेंट विभागात हसणारा इमोजी पोस्ट केले आहेत. जुही व्यतिरिक्त हंसिका मोटवानी, मुश्ताक शेख आणि जय भानुशाली या कलाकारांनी पोस्टवर सुंदर अशा कमेंट्स केल्या आहेत. रितेशचा हा रिल अनेकांना आवडत आहेत.