महाराष्ट्र

maharashtra

रश्मिका मंदान्ना थोडक्यात बचावली; उड्डाणानंतर फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड अन् इमर्जन्सी लँडिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 1:47 PM IST

Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना थोडक्यात बचावली आहे. तिच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय.

Rashmika Mandanna Escaped Death
रश्मिका मंदान्ना मृत्यूपासून बचावली

मुंबई Rashmika Mandanna : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आलीय. नुकतीच ती एका घटनेतून थोडक्यात बचावली आहे. रश्मिकानं तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिलीय. तिच्या या पोस्टमुळे चाहतेही चिंतेत पडले होते. मात्र, काळजी करण्याची गरज नाही रश्मिका पूर्णपणे सुरक्षित आहे. रश्मिका मंदान्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तिच्या एका पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ उडवून गेली आहे. रश्मिका ज्या फ्लाइटनं प्रवास करत होती, त्याच फ्लाइटचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय.

रश्मिका मंदान्ना थोडक्यात बचावली : रश्मिकानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये ती तिच्या सीटवर बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिनं लिहिलं,'फक्त तुमच्या माहितीसाठी, आज आम्ही थोडक्यात बचावलो आहोत." या फोटोमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा दासही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका ज्या फ्लाइटमध्ये बसली होती, ती मुंबईहून हैदराबादला जात होती. तांत्रिक बिघाडामुळं ही फ्लाईट उड्डाणानंतर 30 मिनिटांनी पुन्हा मुंबईला परतली. या घटनेत कोणालाही दुखापत किंवा कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

रश्मिका मंदान्ना मृत्यूपासून बचावली

रश्मिका मंदान्नाचा वर्क फ्रंट : रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतीच रणबीर कपूरसोबत 'अ‍ॅनिमल' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड खळबळ उडवून दिली होती. 'अ‍ॅनिमल'नं बॉक्स ऑफिसवर सुमारे 900 कोटीहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं होतं. रश्मिकाचा हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. सध्या रश्मिका तिच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. याशिवाय आजकाल ती 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रश्मिका पुन्हा एकदा 'श्रीवल्ली'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'पुष्पा 2' चित्रपटात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढं ती 'द गर्लफ्रेंड'आणि 'छावा' चित्रपटामध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. हिना खान आणि मुनावर फारुकी स्टारर 'हल्की-हल्की सी' गाण्याच्या टीझर रिलीजची तारीख जाहीर
  2. कार्तिक आर्यन लग्नासाठी तयार! त्याच्या लेटेस्ट फोटोच्या कॅप्शनमुळे फिमेल फॅन्स अस्वस्थ
  3. रश्मिका मंदान्नानं चाहत्याकडून स्वीकारला लाल गुलाब, 'नॅशनल क्रश'वर कौतुकाचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details