महाराष्ट्र

maharashtra

राखी सावंतनं सलमान खानसाठी पीएम मोदींकडे केलं आवाहन, सर्व वर्गातील सुरक्षाची केली मागणी - rakhi sawant

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 11:36 AM IST

Rakhi Sawant : राखी सावंतनं गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलमान खानसाठी आवाहन केलं आहे. सलमान खानची सुरक्षा वाढवण्याबाबत तिनं पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे.

Rakhi Sawant
राखी सावंत

मुंबई - Rakhi Sawant :बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. आता या प्रकरणी राखीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलमान खानसाठी आवाहन केलं आहे. तिनं सलमानला उच्चस्तरीय सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे. राखी सावंतची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती सलमान खान हा गरिबांचा मसीहा असल्याचं म्हणत आहे. याशिवाय ती पंतप्रधान मोदींनी सलमानची मदत करावी याबद्दल म्हणताना दिसत आहे.

राखी सावंतनं केली पंतप्रधान मोदींना विनंती : या मुलाखतीत तिनं म्हटलं, "मी हात जोडून सलमान भाईला सांगेन की, त्यानं कधीही ईद आणि वाढदिवसाच्या दिवशी बाल्कनीत येऊन उभे राहू नये. तुम्ही चाहत्यांना भेटण्यासाठी एखादे मोठं हॉटेल बुक करू शकता, जिथे कडक सुरक्षा असेल." पुढं तिनं म्हटलं, "कोहिनूर हिऱ्यापेक्षा सलमान खान आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. सलमान खानचे संरक्षण करणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. तो गरिबांचा मसीहा आहे. त्याला झेड, वाय, एक्स, या सर्व वर्गातील सुरक्षा द्याला पाहिजे." राखीनं अशी विनंती मोदीजींना केली आहे. यानंतर तिनं पुढं सांगितलं, "कंगना राणौतला इतकी सुरक्षा देण्यात आली आहे, तिच्या मागे कोणीच लागलं नाही, तरीही तिला विनाकारण सुरक्षा दिली आहे. सलमान खानला खूप सुरक्षा देण्याची गरज आहे, असं मला वाटते. तो बॉलीवूडचा एक दिग्गज आहे."

राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल : आता राखीच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर आता अनेकजण कमेंट्स करून तिला समर्थन देताना दिसत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, "राखी पहिल्यांदा काहीतरी चांगली बोलली, सलमान हा महत्वाचा व्यक्ती आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "राखी तर आता सुंदर दिसत आहे." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "असं कोण समर्थन देते, तिनं तर आता लॉरेंस बिश्नोई गँगला आईडीया दिली आहे."

काय आहे प्रकरण : 1998 मध्ये, सलमान राजस्थानमध्ये 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. यावेळी त्यानं काळ्या काळविटाची शिकार केली होती. काळ्या काळवीटाला बिश्नोई समाज पवित्र मानतात. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. या प्रकरणात त्याची सुटका झाली. यानंतर लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला मारण्याची शपक्ष घेतली. त्यानं अनेकदा भाईजानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. इरफान खानचा मुलगा बाबिल खाननं वडिलांच्या डेथ अ‍ॅनिवर्सरीपूर्वी शेअर केली भावनिक पोस्ट - irrfan khans son babil khan
  2. अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई - Sahil Khan Arrested
  3. "दरमहा 4 लाखाचा ट्रेनर परवडत नाही तर बॉलिवूड सोड" : परिणीती चोप्राला मिळाला होता सल्ला - Parineeti Chopra

ABOUT THE AUTHOR

...view details