महाराष्ट्र

maharashtra

Bhool Bhulaiya 3 Shoot: पाय फ्रॅक्चर असतानाही अनीस बज्मी करतोय 'भूल भुलैया 3' चे शुटिंग, कार्तिक आर्यनचा प्रेरणादायी अनुभव

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 5:36 PM IST

Bhool Bhulaiya 3 Shoot: 'भूल भुलैया 3' या आगामी चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं असून यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती दिमरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. निर्माते अनीस बज्मी यांच्यासह काम करत असल्याच्या अनुभव सांगताना खूपच प्रेरणादायी असल्याचं कार्तिकनं सांगितलं आहे.

Kartik Aaryan Hails Bhool Bhulaiya 3 Director Anees Bazmi for THIS Reason
अनीस बज्मी करतोय भूल भुलैया 3 चे शुटिंग

मुंबई - Bhool Bhulaiya 3 Shoot: फिमेल फॅन्सच्या गळ्यातला ताईत बनलेला बॉलिवूडचा हार्टथ्रोब अभिनेता कार्तिक आर्यन सध्या हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूल भुलैया 3' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगमधील प्रगती जाणून घेण्याची चाहत्यांसह प्रत्येकाला इच्छा आहे. कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शूटची एक झलक शेअर केली आहे. यामध्ये दिग्दर्शक अनीस बज्मीच्या पायाला फ्रॅक्चर दिसत आहे.

अनीस बज्मी करतोय भूल भुलैया 3 चे शुटिंग

कार्तिकने फोटोच्या कॅप्शनमध्ये भूल भुलैया 3 चे दिग्दर्शक अनीस बज्मी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला: " अनीस बज्मी सर त्यांच्या बरोबर शूट करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. तुटलेल्या पायाने ते शूटिंग करत आहेत", असे त्यानं म्हटलंय. अनीस तुटलेला पाय असूनही चित्रीकरण सुरू ठेवल्याने चित्रपट निर्मात्याची चित्रपटाशी बांधिलकी येते. यापूर्वी, कार्तिकने क्रू मेंबर्सचा सेट तयार करतानाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो अपलोड केला होता. हा हॉरर कॉमेडी चित्रपटाचा सेट असल्याचे दिसत होते. 11 मार्च रोजी, विद्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता,ज्यामध्ये संपूर्ण ग्रुप शूटसाठी तयार असल्याचे दिसत होते. ही पोस्ट शेअर करताना विद्याही खूप आनंदी आणि उत्साही दिसली होती.

मिळालेल्या माहितीनुसार भूल भुलैया 3 साठी लोकेशन स्काउटिंगच्या शेवटच्या दिवशी अनीस बज्मीच्या पायाला दुखापत झाली आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या पायवर शस्त्रक्रिया केली आणि यातून रिकव्हर होण्यासाठी तीन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र बज्मी यांनी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा त्यांचा निर्धार होता आणि व्हीलचेअरवरुन त्यांनी आपले हे काम सुरू ठेवले आहे.

'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे. तृप्ती दिमरीही या टीममध्ये सामील झाली असून हा सीक्वेल खास बनणार असल्याचे खात्री कार्तिकच्या चाहत्यांनी गृहित धरली आहे. त्याच्या या पोस्टवर ते भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. उत्कृष्ट कलाकारांसह हा सिनेमॅटिक एक्स्ट्राव्हॅगान्झा मनोरंजन उद्योगात एक नवीन मानक स्थापित करेल याची खात्री निर्मात्यांनाही आहे.

हेही वाचा -

  1. आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांमध्ये कोण सर्वात श्रीमंत? वाचा बातमी
  2. दिलजीत दोसांझ आणि परिणीतीचे 'अमर सिंग चमकिला'मधील ताल धरायला लावणारे 'नरम कालजा' गाणे रिलीज
  3. Madhusudan Kalelkar : मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सव, रंगकर्मी आणि रसिकांसाठी पर्वणी

ABOUT THE AUTHOR

...view details