महाराष्ट्र

maharashtra

वऱ्हाडावर काळाचा घाला ; लग्नाहून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकची धडक, 9 जण ठार - Accidnt in Jahlawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 9:13 AM IST

Accidnt in Jahlawar : राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एका वेगवान ट्रकनं कारला धडक दिली. या दुर्घटनेत लग्नातून परतणाऱ्या 9 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कार चक्काचूर झाली.

राजस्थानात भीषण अपघात; लग्नाहून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकची धडक, 9 जणांचा अंत
राजस्थानात भीषण अपघात; लग्नाहून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकची धडक, 9 जणांचा अंत

झालावाड (राजस्थान) Accidnt in Jahlawar : राजस्थानातील झालावाड जिल्ह्यातील अकलेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात घडलाय. भरधाव वेगात आलेल्या एका अनियंत्रित ट्रकनं कारला धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. आज पहाटे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक एका कारमधून मध्य प्रदेशातून दुगरगाव येथून आपल्या घरी परतत होते. दरम्यान, पाचोऱ्याजवळ एका अनियंत्रित ट्रकनं या कारला धडक दिली. या अपघातामुळं झालावाड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.

अपघातात 9 जणांचा मृत्यू : अकलेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप बिश्नोई यांनी सांगितलं की, अकलेराजवळील डुंगर गावातील नागरिक शनिवारी मध्य प्रदेशात त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेले होते. दरम्यान, लग्नाच्या मिरवणुकीतून निघाले असताना त्यांच्या कारला भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलिसांनी मृतांचे मृतदेह अकलेरा येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात ठेवले आहेत.

परिसरातील दुसरा मोठा अपघात : अपघातात ठार झालेले नागरिक एकाच कुटुंबातील असल्याचं पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं. सध्या पोलीस अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितलं की, अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आलीय. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतरच पुढील कारवाई केली जाईल. गेल्या काही दिवसातील हा दुसरा मोठा अपघात आहे. याआधीही पाच जणांचा डंपरनं चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गंगाधर पोलीस ठाण्याच्या परिसरात उघडकीस आली होती.

हेही वाचा :

  1. कामावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; माती वाहणारा टिप्पर उलटून 5 जणांचा बळी - Bagalkot Accident
  2. शिर्डीत पायी पालखीचा भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर - Palkhi Accident in Shirdi
  3. उत्तर प्रदेशात मोठा अपघात; पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details