शिर्डीत पायी पालखीचा भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर - Palkhi Accident in Shirdi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 5:42 PM IST

Updated : Apr 16, 2024, 6:13 PM IST

Etv Bharat

Palkhi Accident in Shirdi : श्रीरामनवमी निमित्तानं सिन्नर तालुक्यातील पाथरे येथून शिर्डीला येत असलेल्या पायी पालखीला शिर्डीजवळील चांदेकासारे येथे भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. तर दोन महिला गंभीर जखमी आहेत.

शिर्डी Palkhi Accident in Shirdi : साई बाबांच्या दर्शनासाठी विविध भागातून पायी पालखी येत असतात. यातील एका पालखीला आज शिर्डीजवळ अपघात झाला,. यात एका महिलाचा मृत्यू झाला असून, दोन महिला गंभीर जखमी आहेत. जखमींवर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सिन्नर येथील होती पालखी : श्रीरामनवमी निमित्तानं सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील श्रीराम मित्र मंडळाच्या वतीनं पाथरे ते शिर्डी अशी गेल्या 10 वर्षापासून पायी पालखी काढण्यात येते. यंदाच्या वर्षी या पालखीचे 11 वे वर्ष आहे. ही पालखी सिन्नर शिर्डी महामार्गावरील चांदेकासारे शिवारात आली असताना अचानक भरधाव वेगानं आलेली दुचाकी थेट या पालखीत शिरली व अपघात झाला.

जखमींवर शिर्डीत उपचार सुरू : या भीषण अपघातात पालखीतील अनिता दवांगे (वय 45) या महिलेचा जोराची धडक बसल्यानं जागीच मृत्यू झालाय. तसंच कांता चिने व सरला दवांगे या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींवर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने पाथरे गावावर शोकाकुल पसरलीय.

Last Updated :Apr 16, 2024, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.