महाराष्ट्र

maharashtra

अंधाराचा फायदा घेत आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 10:21 PM IST

Tribal woman Gangraped in Sahibganj : साहिबगंजमध्ये तीन तरुणांनी एका मध्यमवयीन आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

साहिबगंज : झारखंडमध्ये बलात्काराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. दुमका येथे एका परदेशी महिलेवर आणि पलामूमध्ये छत्तीसगडमधील एका ऑर्केस्ट्रा कलाकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा साहिबगंजमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे जत्रेत आपलं दुकाणातील सामान विकून परतणाऱ्या एका मध्यमवयीन आदिवासी महिलेवर तीन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार (दि. 7 मार्च)रोजी रात्री उशिरा बोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

अंधाराचा फायदा घेत केला बलात्कार : मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी उशिरा 45 वर्षीय आदिवासी महिला मंगरुतीकर येथे आयोजित फुटबॉल स्पर्धेच्या जत्रेत दारू विकण्यासाठी गेली होती. जत्रा संपल्यानंतर रात्री ही महिला त्याच गावातील तीन तरुणांसह बहियार मार्गे आपल्या घरी परतत होती. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत तीन तरुणांनी महिलेवर बलात्कार करत तेथून पळ काढला.

काही दिवसांतील ही तिसरी घटना : या घटनेनंतर पीडितेने शुक्रवार (दि. 8 मार्च)रोजी सकाळी बोरीओ पोलीस ठाणं गाठून पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशिक्षणार्थी डीएसपी रूपक कुमार सिंह यांनी एक टीम तयार करून कारवाई सुरू केली आणि तीन आरोपींना अटक केली आहे. प्रभारी प्रशिक्षणार्थी डीएसपी रूपक कुमार सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या लेखी अर्जावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन आरोपी बुद्धिनाथ मुर्मू, सुरेश हेमब्रम, बाबू उर्फ ​​परता तुडू यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीने त्यांना कारागृहात पाठवण्यात आलं आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. झारखंडमधील काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details