महाराष्ट्र

maharashtra

तब्बल बारा तासानंतर बोरमधील तरुणाची सुटका, मात्र रुग्णालयात नेत असताना मृत्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 9:38 PM IST

Delhi Jal Board borewell accident: दिल्लीतील ट्रीटमेंट प्लांटच्या बोअरवेलमध्ये पडलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला.

बोरमध्ये पडलेल्या तरुणाचा मृत्यू
बोरमध्ये पडलेल्या तरुणाचा मृत्यू

ईटीव्ही खास रिपोर्ट

नवी दिल्ली :पश्चिम दिल्लीतील केशवपूर मंडीजवळील दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या बोअरवेलमध्ये पडलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आलं. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. 12 तासांनंतर या तरुणाला बाहेर काढण्यात आलं. आज रविवार (दि. 10 मार्च)रोजी पहाटे 2.45 वाजता येथील बोअरवेलमध्ये एक तरुण पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वीर प्रताप यांच्या नेतृत्वाखाली एनडीआरएफच्या 37 जवानांनी बचावकार्य केलं. त्यामध्ये त्यांना यश आलं. मात्र, रुग्णाला उपचारासाठी दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला.

प्रधान सचिवांना तपासाचे आदेश : मंत्री आतिशी यांनी दिल्लीच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून केशवपूर मंडीजवळ झालेला अपघात दुर्दैवी असल्याचं म्हणत चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची वेळेवर चौकशी झाली पाहिजे आणि दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. तसंच, सर्व सरकारी आणि खाजगी ओपण असलेल्या बोअरवेलला ताबडतोब वेल्डेड आणि सील करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

दल्ली जल मंडळाकडून काही त्रुटी राहील्या का? : प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात मंत्री आतिशी यांनी म्हटलं आहे की, केशवपूर सीवरेज ट्रीटमेंट प्लांटमधील बंद बोअरवेलमध्ये एक तरुण पडला. मात्र, ही बोअरवेल 2020 मध्ये दिल्ली मेट्रोच्या ताब्यात देण्यात आलेल्या जमिनीवर होती. तरीसुद्धा, दिल्ली जल मंडळाकडून काही त्रुटी राहिल्या आहेत का? याची चौकशी करणे आणि दिल्लीत अशी कोणतीही घटना घडू नये याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

कार्यालय चारही बाजूंनी बंद होते : 'ईटीव्ही भारत'कडून येथील दुकानदारांशी आणि लोकांशी बोलून माहिती घेतली. दिल्ली जल बोर्डाचे एसटीपी कार्यालय सर्व बाजूंनी बंद होते. मुख्य गेटवर एक सुरक्षा रक्षक होता. अशा परिस्थितीत एसटीपीमध्ये प्रवेश कसा आणि कोणी केला? ही घटना रात्री घडली. कोणीतरी चोरी करण्यासाठी घुसले आणि बोअरवेलमध्ये पडलं का? हे नाकारता येत नाही अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details