महाराष्ट्र

maharashtra

Rajan Salve slammed Kirit Somaiya _ कुठे आमचे राजा भोज आणि कुठे गंगू तेली; राजन साळवी यांची सोमय्यांवर टीका

By

Published : Jul 8, 2022, 7:53 PM IST

रत्नागिरी - शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याबद्दल ट्विटरवरून टीका करणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांच्यावर शिवसेना उपनेते, आमदार राजन साळवी ( MLA Rajan Salvi ) यांनी जोरदार टीका केली आहे. साळवी म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. किरीट सोमय्या हा भाजपचा दलाल आहे. दलालीच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर फिरत असतो, असे त्याचे कर्तृत्व आहे आणि ते जनतेला माहिती आहे. कुठे हा गंगू तेली आणि कुठे आमचे राजा भोज अशी टीका साळवी यांनी यावेळी केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आदर्शवत असे काम केले आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाबाबत संपूर्ण जगाने त्यांना गौरवले आहे. अशा एका सृजनशील व्यक्तिमत्वाबाबत सोमय्या सारख्याने वक्तव्य करणे हे निश्चितच निषेधार्ह असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही गोठवू शकत नाही, असेही राजन साळवी यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details