महाराष्ट्र

maharashtra

Lal Mahal Lavani Controversy : लाल महालात लावणी केलेल्या जागेचे मराठा महासंघाच्यावतीने शुद्धीकरण

By

Published : May 21, 2022, 6:06 PM IST

पुणे - लाल महाल या ऐतिहासिक वास्तूमध्ये जिजाऊंच्या पुतळ्यासमोर मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एका लावणीचे रिल्सचे शूट केले ( Lal Mahal Lavani Controversy ) आहे. लावणीचा रिल्स सोशल मीडियावर येताच, राज्यातील शिवप्रेमीकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर ज्या ठिकाणी शूट झाले. त्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण देखील करण्यात ( Purification of Lal Mahal by Maratha mahasangh ) आले. एक महिन्यांपूर्वी लाल महाल येथे एक रिल्स शूट करण्यात आली होती. ती व्हिडीओ जेव्हा समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली तेव्हा शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करत तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. आणि आज या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details