महाराष्ट्र

maharashtra

कर्जत - खालापूरला मुसळधार पावसाने झोडपले

By

Published : Jul 23, 2021, 7:46 AM IST

रायगड - खालापूर तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले. गेल्या 24 तासांत माथेरान येथे सर्वाधिक 331 मिमी, कर्जत 321 मिमी, खालापूर 202 मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्री नंतर उल्हास, पाताळगंगा व अन्य नद्यांनी आपली पातळी ओलांडली आणि संपूर्ण कर्जत - खालापूर तालुका जलमय झाला. बुधवार रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. अतिवृष्टी पाऊस असाच सुरु राहिल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details