महाराष्ट्र

maharashtra

Pravin Darekar : प्रवीण दरेकर म्हणजे दीड कोटींच्या गाडीतून फिरणारा मजूर.. हजारो कोटी कमावले.. तक्रारदाराचा आरोप

By

Published : Mar 15, 2022, 4:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई : राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात आज माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ( Complaint Lodged Agaist Pravin Darekar ) आला. प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीसाठी ( Mumbai Bank Election ) मजूर संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व मुंबई बँकेचे अध्यक्ष म्हणून ते निवडून देखील आले. याप्रकरणी आम आदमी पक्षाकडून मुंबई पोलिसात तक्रार AAP Complaint Against Pravin Darekar ) देण्यात आली व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार दाखल दाखल करणारे आप पक्षाचे नेते धनंजय शिंदे ( AAP Leader Dhananjay Shinde ) यांच्याशी केलेली ही खास बातचीत.. 70 हुन अधिक बोगस मजूर संस्था धनंजय शिंदे सांगतात की, "प्रवीण दरेकर हे दीड कोटीची गाडी वापरणारे मजूर आहेत. दरेकर यांनी आपल्या कार्यकाळात सुमारे दोन हजार कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार केला आहे. यांनी सुमारे 70 हून अधिक बोगस मजूर संस्था काढल्या असून या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी हजारो कोटी कमावले आहेत. सध्या नेहमीच भ्रष्टाचारावर आवाज उठवणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी दरेकरांवर कारवाई का नाही केली ? सर्व पुरावे समोर असताना महाविकासआघाडी देखील गप्प का राहिली ?" असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. ED कडे तक्रार दाखल करणार धनंजय शिंदे सांगतात, "आता मी या विरोधात ED कडेसुद्धा तक्रार देणार आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रात भ्रष्टाचार निर्मूलन करणाऱ्या ED ला आमची तक्रार घेऊन चौकशी करावीच लागेल." असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details