महाराष्ट्र

maharashtra

Police Raid On Fake Paneer : बनावट पनीरवर पुणेकर मारतात 'ताव'? पोलिसांनी जप्त केलं 4 हजार 970 किलो पनीर

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 2:16 PM IST

Updated : Aug 29, 2023, 3:27 PM IST

बनावट पनीरवर पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : ऐन सनासुदीच्या तोंडावर कर्नाटकातून पुण्यात आणलं जाणारं 10 लाख रुपये किमतीचं 4 हजार 970 किलो बनावट पनीर पुणे पोलिसांनी जप्त केलं आहे. दरोडा तसंच वाहनचोरी विरोधी पथकाच्या यूनिट 1 नं याबाबतची कारवाई केली. कर्नाटकमधून एक टेम्पो पुण्यात बनावट पनीर घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकानं आज सकाळी कात्रज चौकात या टेम्पोवर छापेमारी केली. अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी पंचासह पाहणी केली असता, टेम्पोत 4 हजार 970 किलोग्रॅम लूज पनीर आढळून आलं होतं. यातील पनीरचं सॅम्पल तपासणीसाठी नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर अँड फूड अ‍ॅनालिसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बाणेर इथं पाठवण्यात आलं होतं. यातील काही पाकिटामधील पनीर हे भेसळ असल्याचा अहवाल मिळाला होता. त्यानुसार हे पनीर नष्ट करण्यात येणार आहे. ही कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील यांनी केली.

Last Updated : Aug 29, 2023, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details