महाराष्ट्र

maharashtra

Maratha Reservation : मराठा आंदोलन चिघळलं! आमदार प्रकाश सोळंकेंच्या कारसह अख्खा बंगलाच पेटवला, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 2:25 PM IST

Updated : Oct 30, 2023, 2:52 PM IST

मराठा आंदोलन चिघळले! आमदार प्रकाश सोळंकेंचा अख्खा बंगलाच पेटला; रस्त्यावर टायर ,लाकूड जाळत आंदोलकांकडून सरकारचा निषेध

बीड Beed Maratha Reservation : बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke House Fire) यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. याशिवाय सोळंकेंच्या घराबाहेर (Maratha Protest Beed) असलेल्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर आग इतकी पसरली की त्यांचा अख्खा बंगलाच पेटला. आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे.  

मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलं : बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे. अनेक ठिकाणी बस, लाकूड, टायर जाळत सरकारचा निषेध केल्या जातोय. दरम्यान, सरकारला आम्ही जवळपास तीस दिवसांचा वेळ दिला होता. पण त्यांनी काहीच काम केलं नाही. आरक्षणासाठी 62 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पण सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही असं वाटतंय. त्यामुळं आता येथून पुढं आमदार असो की मुख्यमंत्री प्रत्येकालाच मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. तसंच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मराठा समाजाचं आंदोलन अजून तीव्र होईल, असा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आलाय. 

Last Updated : Oct 30, 2023, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details