महाराष्ट्र

maharashtra

Saint Tyagi Maharaj Video - बद्रीनाथाच्या भेटीची आस; लोटांगण घालत संत त्यागी महाराजांचा ८८५ किलोमीटरचा प्रवास

By

Published : May 26, 2022, 5:20 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

डेहराडून- उत्तराखंडच्या चारही धामांमध्ये भाविकांची गर्दी झाली ( Devotees four Dhams in Uttarakhand ) आहे. दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. काही भाविक हेलिकॉप्टरने, काही कारने तर काही भाविक घोडा-खेचराने प्रवास करून चारधामला भेट देत आहेत. काही भाविक चक्क रस्त्यावर लोटांगण घालत चारधामला पोहोचत आहेत. असे अनेक भाविक बद्रीनाथच्या दर्शनासाठी बाहेर जात आहेत. राजस्थान प्रांतातील भक्त आणि मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील संत त्यागी महाराज हे बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठी रस्त्यावर लोटांगण घालत ( Saint Tyagi Maharaj from Morena district ) आहेत. ही श्रद्धा पाहून अनेक भाविक चकित होत आहे. रस्त्यावर लोटांगण घालत संत त्यागी महाराजांनी ८८५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. शुक्रवारी ते भगवान बद्री विशालच्या ( Bhagwan Badri Vishal in Uttrakhand ) दरबारात पोहोचतील अशी अपेक्षा आहे. भगवान विष्णूंबद्दलची श्रद्धा मनात ठेवून ७५ वर्षीय संत त्यागी महाराज मोरेनापासून ९०० किमीचा हा प्रवास थकवा न घेता प्रवास करत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details