महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut : देशातील लोकशाही धोक्यात; संजय राऊतांचा केंद्रातील सरकारवर घणाघात

By

Published : Mar 25, 2023, 3:53 PM IST

देशातील लोकशाही धोक्यात; संजय राऊतांचा केंद्रातील सरकारवर घणाघात

नाशिक : मालेगावात होणारी सभा ही देशाला संदेश दिली जाणारी सभा असणार आहे. ही सभा विरोधी पक्षाला दिशा दाखवणारी सभा असणार आहे. सध्या दळभद्री राजकारण देशात आणि राज्यात सुरू असून, या देशात मोदी यांचे अंधभक्त तयार झाले आहेत. तसेच, राहुल गांधींवर झालेली कारवाई म्हणजे लोकशाही धोक्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. या देशातील मुसलमान प्रखर राष्ट्रभक्त मुसलमान आहे. इंग्रजांप्रमाणे मालकी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मालेगावच्या सभेला मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज असणार आहे. जर आम्ही मिंधे गटापुढे गुडघे टेकले असते, तर आम्हाला तुरुंगात जायची वेळ आली नसती, याच पद्धतीने राहुल गांधी जुलमी सरकार पुढे झुकले नाहीत व यासाठी त्यांनी खासदरकी गमावली. शहाणे आणि इमानदार असाल तर राजीनामे द्या. लोक आपल्याला मिंधे आणि खोकेवाले का म्हणतात मुख्यमंत्री यांनी याचा विचार करावा. तसेच, ज्या पद्धतीने आताचे सरकार देश चालवत आहे त्याचा विचार करता देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे सरळसरळ जाणीवपूर्वक केलेले कारस्थान आहे. न्यायव्यवस्था, तपासयंत्रणा हाताशी धरून मोठा खेळ चालू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details