महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar Metro Ride : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात मेट्रो सफर, पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 12, 2023, 12:48 PM IST

अजित पवारांची मेट्रो सफर

पुणे :पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मेट्रोने प्रवास केला आहे. रुबी हॉल क्लिनिक ते वनाज या मेट्रो स्थानकापर्यंत त्यांनी आजची पुणे मेट्रो सफर केली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या मेट्रोतून प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक पुणेकरांशी संवाद देखील साधला आहे. अजित पवार आज चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन करण्यासाठी पुण्यात आले आहेत. या उद्घाटनस्थळी पोहचण्यासाठी त्यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केलेला आहे. प्रवास करताना प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी गर्दीतून उभ्यानेच प्रवास केला.१ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन पार पडले होते. पुणे मेट्रो सकाळी सात ते रात्री दहावाजेपर्यंत सुरू असते. 

ABOUT THE AUTHOR

...view details