महाराष्ट्र

maharashtra

Eknath Shinde News: दहिसर नदीवरील वाहतूक पुलाचा पहिला टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते खुला

By

Published : Mar 12, 2023, 9:47 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिदे

मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग हद्दीत, बोरिवली स्थित श्रीकृष्ण नगरात, पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून दहिसर नदीवर पुनर्बांधणी होत आहे. या नदीवरील वाहतूक पुलाचा पहिला टप्पा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते शनिवारी सायंकाळी समारंभपूर्वक खुला करण्यात आला. स्थानिक खासदार श्री. गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार श्री. प्रकाश सुर्वे, आमदार श्री. प्रवीण दरेकर, आमदार श्रीमती मनीषा चौधरी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. श्रीमती भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (पूल) श्री. संजय कौंडिण्यपुरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details