महाराष्ट्र

maharashtra

Chandrayaan 3 : चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फडकू दे.. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचं गणपती बाप्पाला साकडं

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 1:26 PM IST

चंद्रयान मिशनसाठी गणपती बाप्पला साकडं

नागपूर: भारतीय शास्त्रज्ञानी चंद्रयान मोहिमेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष चंद्रयान मोहिमेकडं लागलंय. ही चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी याकरिता देशभरातील नागरिक प्रार्थना करत आहेत. सर्वत्र होम-हवन, पूजाअर्चा केली जात आहे. यामध्ये राजकीय पक्षदेखील मागे नाहीत. नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी गणपती बाप्पाला साकडं घातलंय. त्याकरिता टेकडी गणेश मंदिरात विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय होम-हवन देखील करण्यात आलं. भारत देश जरी विज्ञान क्षेत्रात भरारी घेत असला तरी चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी देशवासियांच्या भावनेला धार्मिक जोड आहे. त्यामुळे हे मिशन पूर्ण होऊ दे आणि चंद्रावर भारताचा तिरंगा झेंडा फडकू दे, अशी मागणी नागपूमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पांकडे केली. 

ABOUT THE AUTHOR

...view details