महाराष्ट्र

maharashtra

Nehru Jayanti सिंधुदुर्गमधील कलाकाराने बालदिनाच्या दिल्या वाळूशिल्पातून शुभेच्छा

By

Published : Nov 14, 2022, 1:51 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

१४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती Pandit Jawaharlal Nehru Jayanti अर्थात बालदिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले सोन्सुरे येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंचे भव्य वाळूशिल्प Magnificent sand sculpture साकारले. १४ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस बाल दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. या निमित्ताने वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं वाळूशिल्प साकारल आहे. वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वेंगुर्ले सोन्सुरे येथे खाडी आणि समुद्रातील वाळवून वाळू शिल्पांचे एक म्युझियम तयार केले आहे. त्याच्या या म्युझियम ला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. यापूर्वी त्याने अनाथांची माय सिंधुताई सकपाळ, श्री स्वामी समर्थ, प्रसिद्ध क्रिकेटर शेण वॉर्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत अशा विविध महानिय व्यक्तींची वाळू शिल्पे साकारत तरी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू जयंती अर्थात बालदिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले सोन्सुरे येथील प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंचे भव्य वाळूशिल्प साकारत बाल दिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details