महाराष्ट्र

maharashtra

अग्निपथ योजना सर्वश्रेष्ठ, आर्मी प्रमुख जनरल मनोज पांडे यांचं मत

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 4:18 PM IST

सैनिक

पुणेAgneepath Scheme Benefits : केंद्र सरकारनं आर्मीमध्ये अग्निपथ ही योजना जाहीर केल्यावर मोठ्या प्रमाणावर या योजनेला विरोध करण्यात आला. (Army Chief On Agneepath Scheme) या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलं. असं असताना ही योजना सर्वश्रेष्ठ असल्याचं मत आर्मी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग येथे ते बोलत होते. (Indian Army Chief General Manoj Pandey)

आधी विरोध, आता कौतुक :या योजनेची घोषणा २०२२ साली जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना 'अग्निवीर' म्हटलं जातं. तरुणांना या योजनेंतर्गत मिलीटरीत ४ वर्षे सेवा देता येईल. त्या नंतर त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम देखील करता येणार आहे. मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येतील. ही योजना जाहीर झाल्यावर मोठ्या प्रमाणावर या योजनेला विरोध करण्यात आला. मात्र सेना प्रमुखांनी या योजनेचं कौतुक केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details