महाराष्ट्र

maharashtra

कोरोनामुळे टिपेश्वर अभयारण्य 30 एप्रिलपर्यंत बंद

By

Published : Apr 9, 2021, 5:41 PM IST

Updated : Apr 9, 2021, 7:23 PM IST

व्याघ्रदर्शनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात मागील दोन महिन्यापासून पर्यटक मोठ्या प्रमाणात हजेरी लावीत आहेत. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 30 एप्रिलपर्यंत हे अभयारण्य पुर्णपणे बंद असणार आहे.

टिपेश्वर अभयारण्य
टिपेश्वर अभयारण्य

यवतमाळ - व्याघ्रदर्शनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य प्रसिध्द आहे. मागील दोन महिन्यापासून पर्यटक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बुकिंंगद्वारे याठिकाणी हजेरी लावत आहेत. मात्र, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 30 एप्रिलपर्यंत हे अभयारण्य पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी वन्यजीव विभागाला दिले आहे.

टिपेश्वर अभयारण्य
अभयारण्यात 20 पेक्षा जास्त वाघांची संख्याहे अभयारण्य क्षेत्रफळाने लहान असले तरीही जवळपास 20 वाघ या अभयारण्यात आहे. ढगाळ वातावरणामुळे गर्मी होत असल्याने हे वाघ पाणवठ्यावर येत आहे. त्यामुळे पर्यटकांना टिपेश्वर अभयारण्यात वाघांचा मुक्त संचार बघायला मिळत होता. दोन्हीही गेट केले बंदसकाळी 5.30 ते 7 व दुपारी 3 ते 4.30 या कालावधीत पर्यटकांना अभयारण्यात सोडण्यात येत होते. मात्र आता हे दोन्हीही गेट बंद करण्यात आले आहे.
Last Updated : Apr 9, 2021, 7:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details