महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या शिकारीचा प्रयत्न

By

Published : May 29, 2019, 11:45 PM IST

अंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून शोधमोहीम राबवली. टिपेश्वर, वनरक्षक सुन्ना बिट यांना कक्ष क्रमांक १०१ मध्ये शंभू नाल्यात शिकारी करीता दोरीचे फासे लावल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणाहून ३ किलोमीटर परिसरातील कोबई, कोपामांडवी व अंधारवाडी या गावांमध्ये फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे.

टिपेश्वर अभयारण्यात वाघाच्या शिकारीचा प्रयत्न

यवतमाळ - टिपेश्वर अभयारण्यात रेडीओ कॉलर लावलेल्या टी १ सी ३ वाघाला फास लाऊन शिकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या अभयारण्यात लावण्यात आलेल्या फासमध्ये वाघाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वाघाला बेशुद्ध करून त्याच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न टिपेश्वर अभयारण्याच्या प्रशासनाकडून सुरू आहे.

सकाळच्या सुमारास टिपेश्वर अभयारण्यात सफारीसाठी आलेले पर्यटक भट्ट यांच्यासोबत गाईड सलमान बरकत खान, सफारी करत असताना कक्ष क्रमांक १०० मध्ये पिलखान नाल्याजवळ वाघ दिसला. त्यानंतर पर्यटकांनी त्याचे छायाचित्र घेतले. यात वाघाच्या उजव्या पायाच्या पंज्याच्या वर दोरीचा फास अडकून जखमी झाल्याचे दिसले. दुसऱया वाहनातील पर्यटक आदित्य क्षीरसागर (रा. पुणे) यांच्यासोबत असलेले गाईड राजेंद्र चुकाबोटलावार यांनी सुध्दा पर्यटकांनी घेतलेल्या छायाचित्रावरून वाघाच्या पायाला जखम झाल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती तत्काळ पांढरकवडाचे विभागीय वन्यजीव अधिकारी डॉ. चेतन पतौड व सहकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नाल्याजवळील कक्ष क्रमांक १०० मध्ये जाऊन या वाघाचे VHF अँटेनाद्वारे लोकेशन घेतले असता, वाघाचे लोकेशन नाल्यातील गवताच्या दिशेने मिळाले. वाघाचे लोकेशन असलेल्या दिशेने जाऊन निरीक्षण केले असता, वाघ नाल्यातील गवतामध्ये बसलेले दिसले.

जखमी वाघाच्या निरीक्षणासाठी जागोजागी कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. तसेच क्षेत्रीय सहायक इरफान यांनी वाघावर लक्ष ठेवण्याकरीता उंच झाडावरून निरीक्षण केले. वाघ पळून जात असताना लंगडत असल्याचे निदर्शनास आले. अंतर्गत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून शोधमोहीम राबवली. टिपेश्वर, वनरक्षक सुन्ना बिट यांना कक्ष क्रमांक १०१ मध्ये शंभू नाल्यात शिकारी करीता दोरीचे फासे लावल्याचे निदर्शनास आले होते. या ठिकाणाहून ३ किलोमीटर परिसरातील कोबई, कोपामांडवी व अंधारवाडी या गावांमध्ये फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. टिपेश्वर अभयारण्यातील टी १ सी ३ या वाघाच्या पायात दोरीचा फास अडल्याने ती जखमी झाली आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यास बेशुध्द करून उपचार करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी प्रमोद पंचभाई यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details