महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळच्या वणीमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; उपोषणात होते सहभागी

By

Published : Nov 4, 2021, 2:03 PM IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने वेतन रोखल्याने घरची चूल पेटवायची कशी, हाच खरा प्रश्न चंद्रकांत यांच्यासमोर उभा होता. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक व चालक यांनी उपोषण सुरू केले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून चंद्रकांत घरी जेवण करत नव्हते. काल रात्रीही जेवण न करता झोपले होते.

एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

यवतमाळ - मागील चार दिवसांपासून एसटी कर्मचारी यांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनात चंद्रकांत किसन मडावी हेसुद्धा सहभागी होते. उपोषण सुरू झाल्यापासून घरी सुद्धा जेवण करत नव्हते. काल रात्री त्यांची अचानक प्रकृती बिघडली असता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या दिवशी घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूने कुटूंबावर आभाळ कोसळले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

यवतमाळच्या वणीमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

घरातील कर्ता पुरूष -

मृतक चंद्रकांत किसन मडावी (वय 45) हे सुभाष चंद्र बोस चौकात हिवरकर यांच्याकडे भाड्याने राहत होते. ते कुर्ला घोन्सा येथील मूळ रहिवासी असून यापूर्वी चिपळूण-रत्नागिरी डेपोला चालक म्हणून काम करीत होते. तीन वर्षांपासून वणी येथे चालक म्हणून कार्यरत होते. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने वेतन रोखल्याने घरची चूल पेटवायची कशी, हाच खरा प्रश्न चंद्रकांत यांच्यासमोर उभा होता. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक व चालक यांनी उपोषण सुरू केले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून चंद्रकांत घरी जेवण करत नव्हते. काल रात्रीही जेवण न करता झोपले होते. सकाळी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रकृती अत्यंत खराब दिसून आली. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात वनी येथे आणले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. चंद्रकांत यांचा मृत्यू झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details