महाराष्ट्र

maharashtra

Charas Smuggling By Police: पोलिसचं ठरले नशेचे सौदागर; कल्याणमध्ये चरस तस्करी प्रकरणी दोन पोलिसांना बेड्या

By

Published : Nov 16, 2022, 5:25 PM IST

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चरसची तस्करी (Charas Smuggling By Police) करत असताना ठाणे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (Narcotics Control Division) पथकाने सापळा रचून अटक केली आहे. महेश वसेकर आणि रवी विशे असे अटक केलेल्या पोलीस तस्करांची नावे आहेत.

Charas Smuggling By Police
पोलिसचं ठरले नशेचे सौदागर

ठाणे: जप्त केलेले चोरीचे भंगार पोलीस ठाण्याच्या आवारातून भंगार माफियांना विक्री केल्याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी सुरु असल्याची घटना ताजी असतानाच, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चरसची तस्करी (Charas Smuggling By Police) करत असताना ठाणे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (Narcotics Control Division) पथकाने सापळा रचून अटक केली आहे. महेश वसेकर आणि रवी विशे असे अटक केलेल्या पोलीस तस्करांची नावे आहेत.

पोलिसचं ठरले नशेचे सौदागर

तस्कर महेश आणि रवी हे दोघे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (Kalyan Lohmarg Police Station) पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून चरसची तस्करी करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाला खबऱ्या मार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी किल्ला नजीक काल सायंकाळच्या सुमारास सापळा रचला होता. त्यावेळी दोन्ही तस्कर दुचाकीवरून या ठिकाणी येताच, त्यांच्यावर पथकाने झडप घालून दोघांना ताब्यातघेतले. त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता या दोघा तस्करांकडून चार लाख किंमतीचा ९२१ ग्रॅम चरस जप्त केला.

दरम्यान, या दोघांविरोधात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आज दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता, अधिक पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या दोघा तस्करांनी हा चरस कुठून आणला. तसेच कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होते. याचा तपास ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी संजय शिंदे हे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details