महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime News : धावत्या लोकलमधील प्रवाशांच्या पिशव्या लांबवणाऱ्याला अटक

By

Published : Mar 27, 2022, 3:06 PM IST

कोपर रेल्वे स्थानकात ( Kopar Railway Station ) मागील काही दिवसांपासून प्रवाशांच्या हातातील पिशव्या लांबवल्या जात ( Theft From Running Local Train ) होत्या. त्या पिशव्या लांबवणाऱ्या चोरट्याला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ( Dombivli Railway Police Arrest Theft ) अटक केली आहे.

Dombivli Railway Police
Dombivli Railway Police

ठाणे -डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकात ( Kopar Railway Station ) गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या हातामधील पिशव्या, मोबाईल लांबविण्याचे प्रकार चोरट्यांकडून सुरू ( Theft From Running Local Train ) होते. आता डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी कोपर रेल्वे स्थानकात पाळत ठेवून प्रवाशांच्या पिशव्या चोरणाऱ्या या भामट्याला अटक केली ( Dombivli Railway Police Arrest Theft ) आहे. संजीवन बाळू सूर्यराव ( वय 36, राहणार ठाणे, तालुका शहापूर ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

चोरटा काही क्षणातच पळवायचा पिशव्या -संतोष शिंदे हे प्रवासी भायखळा ते कल्याणच्या दरम्यान शनिवारी प्रवास करत होते. कोपर रेल्वे स्थानकात आल्यावर एका अज्ञात व्यक्तीने शिंदे यांची पिशवी काढून घेतली होती. संतोष शिंदे यांनी चोर चोर म्हणून ओरडा करताच पादचाऱ्यांनी कोपर रेल्वे स्थानकात चोरट्याला रंगेहात पकडले. त्याला कोपर रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवन याने यापूर्वी अशा प्रकारच्या किती चोरी केल्या आहेत, याचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरु केला आहे. तर आज ( रविवार ) चोरट्याला कल्याण रेल्वेच्या सुट्टीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रवाशांवर पाळत ठेवून पिशव्या पळवण्याचे प्रकार -प्रवासी लोकलमध्ये चढण्याच्या गडबडीत असतात. तेव्हा हा भामटा अशा महिला, पुरुष, जवळ लहान मुले असलेल्या प्रवाशांवर पाळत ठेवून त्यांच्या हातामधील पिशवी किंवा मोबाईल हिसकावून पळून जात होता. काही दिवसांपासून कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या हातामधील पिशव्या पळवण्याचे प्रकार वाढले होते. डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लोकल मधील मंचावर ठेवलेल्या पिशव्या चोरीला जात होत्या.

हेही वाचा -Suspicious Transactions : यशवंत जाधवांनी 'मातोश्री'ला दिले 2 कोटी 60 लाख? आयकरने जप्त केलेल्या डायरीतउल्लेख

ABOUT THE AUTHOR

...view details