महाराष्ट्र

maharashtra

भिवंडीत तरुणाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय

By

Published : Sep 17, 2019, 10:11 AM IST

भिवंडीत तालुक्यातील पडघ्या लगतच्या कुरुंद गावात लोखंडी छताला रस्सीने टांगलेल्या अवस्थेत सागर सुरेश पठारे या तरूणाचा मृत्यूदेह आढळून आला. त्याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. मात्र, त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली असावी असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबियांनी केला आहे.

thane

ठाणे- एका तरुणाचा मृतदेह एका चाळीच्या लोखंडी छताला रस्सीने टांगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पडघ्या लगतच्या कुरुंद गावात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करून त्याचा मृतदेह रस्सीने गळफास लावून लटकविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सागर सुरेश पठारे (वय२७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रतिक्रिया देताना मृताचा भाऊ


पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील पडघ्या लगतच्या कुरुंद गावातील सागर सुरेश पठारे या तरुणाचा मृतदेह आढळून आला. कुरुंदच्या दाता, आदिवासीवाडी येथील साईनाथ भोईर यांच्या निवासी चाळीतील छताच्या लोखंडी दांड्याला गळफास घेतल्याच्या अवस्थेत सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. सागर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासीवाडी येथील गणपतीत गेला असावा असे कुटूंबियांना वाटले होते. मात्र त्याने गळफास घेतल्याच्या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांना धक्काच बसला. त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली असावी असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबियांनी केला आहे. पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला असून तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पडघा पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details