महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime : 'संडे, मंडे'चे 'स्पेलिंग' येत नाही, म्हणून सहा वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षिकेकडून अमानूष मारहाण

By

Published : May 16, 2023, 5:27 PM IST

ठाणे जिल्ह्यातील भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकल्याला खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षिका प्रतिमा सुभाषचंद्र प्रजापती यांच्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. लाकडी काठीने पाठीवर, हातावर, डोक्यावर मारले असून मोठ्या प्रमाणात पाठीवर वळ आले आहेत. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Student Brutally Beaten In Thane
शिक्षिकेकडून अमानूष मारहाण

लहानग्या विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

ठाणे (मिरा भाईंदर):भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये राहणारे कल्पना निशाद यांचा सहा वर्षीय मुलगा 'सिनियर केजी'मध्ये शिक्षण घेत आहे. शाळेला सुट्टी असल्याने इंग्रजीचा सराव करण्यासाठी पालक मुलाला परिसरात असलेल्या प्रतिमा प्रजापती यांच्याकडे क्लासेसला पाठवत होते. दिनांक ११ मे रोजी साडेदहाच्या सुमारास मुलगा रडत रडत घरी आला. त्यावेळी त्याने सांगितले की, शिक्षिका प्रतिमा हिने मला 'संडे, मंडे'मधील 'स्पेलिंग' वाचता येत नाही, म्हणून खूप मारले आहे. कल्पना यांनी आपल्या मुलाची परिस्थिती पाहता त्याला अमानुषपणे मारहाण केल्याचे निदर्शनास आले.

शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल: पालक कल्पना निशाद यांनी तात्काळ भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संबंधित शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंटराव पाटील यांनी दिली आहे.

महिला तिच्या मुलाला भाईंदर पोलीस ठाण्यात घेऊन आली तेव्हा त्या लहानग्या मुलाच्या पाठीवर मारल्याचे वळ होते. या घटनेत मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध आयपीसी 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिकेला नोटीस देण्यात आली असून तिला कोर्टात हजर केले जाणार आहे. - मुगुटराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

शिक्षकाची आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण: गोंदिया जिल्ह्यात शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत 14 सप्टेंबर, 2024 रोजी घडली होती. या घटनेमुळे संतप्त पालकांनी आपला रोष शाळा व्यवस्थापनावर व्यक्त केला. सदर शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे, तसेच पोलिसात देखील तक्रार केली आहे.

पालकांची पोलिसात तक्रार: आरटीईच्या नियमातंर्गत देवरी तालुक्यातील मुरपर या गावातली विद विद्यार्थी हा प्रेगेसिव्ह इंटरनँशनल शाळेत शिकतो. शाळेचा सकाळच्या शारीरिक सराव सुरू असताना या शाळेतील शिक्षकाने शुल्लक कारणावरून सौरभ या आदिवासी विद्यर्थाला आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होईपर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारहाण केली. याची माहिती त्याच्या वडिलांना होताच, त्यांनी शाळेत धाव घेतली. विद्यार्थीला गावी घेऊन आले. विचारपूस केली असता विद्यार्थीने आपल्याला मारहाण केली असल्याचे घरच्यांना सांगितले. याची तक्रार त्यांनी देवरी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना केली. मात्र काही दिवस झाले तरी काही कार्यवाही न झाल्याने त्यांनी सरळ धाव पोलीस ठाण्यात घेतली. त्या शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पोलीस तक्रार केली

हेही वाचा:

  1. Kalicharan Maharaj News: समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने कालीचरण महाराजांसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा; भाजपने फेटाळले आरोप
  2. Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधी मानहानी प्रकरण, उच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार
  3. leopard Hunted The Dog: बिबट्याने तरुणाच्या उशाशी झोपलेल्या कुत्र्याची केली शिकार; पहा सीसीटिव्ही

ABOUT THE AUTHOR

...view details