leopard Hunted The Dog: बिबट्याने तरुणाच्या उशाशी झोपलेल्या कुत्र्याची केली शिकार; पहा सीसीटिव्ही

By

Published : May 16, 2023, 3:37 PM IST

thumbnail

पुणे : बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. याआधीही भरवस्तीत बिबट्या किंवा रानटी प्राणी घुसून ग्रामस्थांना त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचे वावर असून गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट्याचे दर्शन हे रोजच होत आहे. अनेक भागात तर मोठ्या संख्येने जनावरांचे नुकसान तसेच माणसांवर हल्ले झाल्याच्या घटना या मधल्या काही काळात घडल्या आहे.अश्यातच आता जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील नगर - कल्याण महामार्गावर असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स पत्रा शेडमध्ये असणाऱ्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली आहे. तेही एक जण झोपलेला असताना त्याच्या उशाशी हा कुत्रा झोपला होता. या घटनेत तरुण मात्र थोडक्यात बचावला आहे. सीसीटिव्ही मध्ये पाहिले तर मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास बिबट्या वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलांनी आला. बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याचा आवाज आल्याने सुधाकरला जाग आली. सुधाकर याच्या डोळ्यादेखत बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आणि शिकार तोंडात धरून बिबट्या घटनास्थळवरून पसार झाला आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.