महाराष्ट्र

maharashtra

चोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर हत्येचा गुन्हा दाखल..

By

Published : Oct 18, 2020, 8:27 PM IST

एका मोबाईल चोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कॉम्पलेक्समधील गोदाम परिसरात घडली आहे.

ठाणे
murder-case-filed-on-warehouse-owner

ठाणे - एका मोबाईल चोरट्याच्या मृत्यू प्रकरणी गोदाम मालकासह कामगारांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कॉम्पलेक्समधील गोदाम परिसरात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गोदाम मालक कुशल हसमुख याच्यासह त्यांच्या कामगारांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील कुशल हसमुख दोशी यांच्या गोदामाच्या नूतनीकरणाचे काम ६ कामगार करीत होते. पहाटे चारच्या सुमारास ३ चोरट्यांनी कामगारांचे ३ मोबाईल चोरले होते. याची माहिती मिळताच गोदाम मालक आणि कामगारांनी चोरट्यांचा शोध घेतला. त्यावेळी दोन चोरटे पळून गेले. मात्र एक चोरटा जखमी अवस्थेत पळून जाताना कामगारांच्या तावडीत सापडला. गोदाम मालक कुशल दोशी आणि त्यांच्या कामगारांनी सकाळी पोलिसांना जखमी चोर मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी चोरट्याला भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान चोरट्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोदाम मालक कुशल दोशी यांच्यासह त्याच्या कामगारांवर हत्येचा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव भरत कनक साई असे असून त्याच्या दोन साथीदारांवरही पोलिसांनी मोबाईल चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details