महाराष्ट्र

maharashtra

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले; १३३ प्रभागाची रचना जाहीर

By

Published : May 15, 2022, 1:16 PM IST

यंदाची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून ४४ प्रभाग असणार आहेत. त्यापैकी ४३ प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण १३३ सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत. त्यापैकी ६७ जागा महिलांसाठी आहेत. तर एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी १३ जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी ७ राखीव आहेत. तसेच अनुसूचित जमाती साठी ४ जागा असून त्यापैकी २ जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण (खुल्या) जागा ११६ असून त्यापैकी ५८ जागा महिलांसाठी राहणार आहेत.

kalyan dombivali municipal corporation 133 ward structure announced
कल्याण डोंबिवली महापालिका १३३ प्रभागाची रचना जाहीर

ठाणे -कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची रूपरेषा निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. यंदाच्या निवडणुकीत १३३ प्रभागाच्या सीमा प्रसिद्धी करून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. आज सर्वच १३३ प्रभागाची सीमांकनावर अंतिम निर्णय होऊन नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महापालिका हद्दीतील १५ लाख १८ हजार ७६२ लोकसंख्या -१ फेब्रुवारी २०२२ ला महापालिका निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी दोन आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता. त्यांनतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरण पत्र १६ फेब्रुवारीला राज्य निवडणूक आयोगास सादर केले. राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम २६ फेब्रुवारीपर्यंत होता. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगास २ मार्च रोजी पाठविले होते. २०११ च्या जनगणने नुसार महापालिका हद्दीतील १५ लाख १८ हजार ७६२ लोकसंख्या आहे. याच लोकसंख्याच्या आधारवर प्रभाग रचनेवर अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला.

असे असेल पॅनल पद्धतीने प्रभागांचे आरक्षण -यंदाची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार असून ४४ प्रभाग असणार आहेत. त्यापैकी ४३ प्रभाग त्रिसदस्यीय व एक प्रभाग चार सदस्यांचा असेल. त्यामुळे एकूण १३३ सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत. त्यापैकी ६७ जागा महिलांसाठी आहेत. तर एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी १३ जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी ७ राखीव आहेत. तसेच अनुसूचित जमाती साठी ४ जागा असून त्यापैकी २ जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण (खुल्या) जागा ११६ असून त्यापैकी ५८ जागा महिलांसाठी राहणार आहेत.

तिरंगी सामना होणार -महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करता अंतिम प्रारुप प्रभाग रचना www.kadmcelection.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती पालिका उपआयुक्त (निवडणूक) सुधाकर जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते निवडणूक कामाला लागले आहे. तर यंदाच्या निवडणुकीत सर्वच प्रभागात महाविकास आघाडी , भाजप आणि मनसे असा तिरंगी सामना होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details