महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाचे नियम धुडकावत गावकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडी; व्हिडिओ व्हायरल

By

Published : Aug 31, 2021, 8:26 PM IST

Updated : Aug 31, 2021, 8:33 PM IST

दहीहंडी
दहीहंडी

कोरोना नियम पायदळी तुडवत दहीहंडी उत्सव कल्याण तालुक्यातील एका गावात साजरा करण्यात आला. यात दहीहंडी फोडतानाचा शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.

ठाणे -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिकरित्या सण, उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे, असे असतानाही कोरोना नियम पायदळी तुडवत दहीहंडी उत्सव कल्याण तालुक्यातील एका गावात साजरा करण्यात आला. यात दहीहंडी फोडतानाचा शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे.

कोरोनाचे नियम धुडकावत गावकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडी


बेफिकिरी पाहता धोक्याची घंटा

कल्याण तालुक्यातील टिटवाळा जवळील घोटसई गावात आज (मंगळवार) दहीहंडी फोडायला नागरिकांची तुफान गर्दी झाली होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली असली तिसऱ्या लाटेचा धोका आजही कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून सरकारने लॉकडाऊनमधील निर्बध शिथिल केलेत. मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता नागरिकाना मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग ठेवणे, अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यानंतर देखील नागरिकांकडून सुरू असलेली बेफिकिरी पाहता ही धोक्याची घंटा ठरू शकते. शेकडो नागरिकांनी दहीहंडी फोडताना गर्दी करत कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले.आता कल्याण तालुका पोलीस हा व्हायरल व्हिडिओ पाहून काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -ठाण्यात गायिका फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला गर्दी; कोरोनाचे नियम पायदळ

Last Updated :Aug 31, 2021, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details