ETV Bharat / politics

गिरीश महाजन यांच्याकडं लोण्याचं मडकं, कुठं लोणी लावतात सांगणार नाही; वडेट्टीवारांची महाजनांवर टीका - Vijay Wadettiwar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 6:46 PM IST

Vijay Wadettiwar on Girish Mahajan : महायुतीतील नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन मंत्री छगन भुजबळ नाराज नसल्याचं माध्यमांना सांगितलंय, यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची खिल्ली उडवलीय.

गिरीश महाजन यांच्याकडं लोण्याचं मडकं, कुठं लोणी लावतात सांगणार नाही; वडेट्टीवारांची महाजनांवर टीका
गिरीश महाजन यांच्याकडं लोण्याचं मडकं, कुठं लोणी लावतात सांगणार नाही; वडेट्टीवारांची महाजनांवर टीका (ETV Bharat Reporter)

विजय वडेट्टीवार (ETV Bharat Reporter)

मुंबई Vijay Wadettiwar on Girish Mahajan : लोकसभा निवडणुकीत राज्यात शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीत शिंदे शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना मिळाल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन त्यांच्या भेटीला गेले आहेत. यावर गिरीश महाजन यांच्याकडं लोण्याचं मडकं असून ते कुठं कुठं लोणी लावतात, ते आपण सांगणार नसल्याचं म्हणत गिरीश महाजन यांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खिल्ली उडवलीय.



महाजन यांच्याकडे लोण्याचं मडकं : महायुतीतील नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील ते जास्त सक्रिय दिसले नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या सभेत त्यांची नाराजी दूर झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटीलांनी भुजबळ नाराज असल्याचं आपल्याला समजल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन मंत्री छगन भुजबळ नाराज नसल्याचं माध्यमांना सांगितलंय. यावर गिरीश महाजन यांच्याकडे लोण्याचं मडकं आहे, ते प्रत्येक वेळेस लोणी घेऊन पोहोचतात. कुठं लावतात हे आम्ही सांगणार नाही, असं म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केलीय.


विजयी संकल्प सभा : विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी इंडिया आघाडीच्या सभेच्या पूर्वी सभास्थळाची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही सभेसाठी शिवाजी पार्क मागितलं होतं मात्र मिळालं नाही. अर्ज मागं पुढं झाला. आजची सभा ही विजयी संकल्प सभा आहे. आजची शेवटची सभा आहे. ही सभा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महत्वाची आहे. पाचव्या टप्प्यात 13 जागा आहेत. त्यामुळं चांगलं यश मिळेल असा विश्वास वड्डेटीवार यांनी व्यक्त केला. तसंच लोकांना महायुतीच्या सभेचा किळस आलाय. पंतप्रधानांच्या भाषणाचा उत्साह राहिला नाही. आम्ही 100 टक्के या देशातील सत्ता हातात घेणार आहेत. इंडिया आघाडी एक पर्याय म्हणून समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय.


4 जूनला सगळं समोर येईल : ईडीच्या कारवाईनंतर प्रथमच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत सभेला संबोधित करणार आहेत. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "आज सर्वोच्च न्यायालयानं टिप्पणी केली आहे. त्यामुळं विशेष कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर त्यात ईडीला कारवाई करता येत नाही. त्यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय हेतूनं केल्याचं सिद्ध झालंय. पुरावा नसताना त्यांना अटक करुन निवडणुकीच्या काळात राजकीय फायदा करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न होता." तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला देखील वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय. 4 तारखेला दिसेल कुणाचा सुफडा साफ झाला. महायुतीच्या पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दिसले नाहीत. हा सगळा बदलत्या वातावरणाचा परिणाम आहे. वातावरण बदलतं तसं माणसं बदलतात. तसंच संविधान बदलाचच काम चालू असल्याचा आरोपही विजय वड्डेटीवार यांनी केलाय.


हेही वाचा :

  1. बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार; पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठणार? - lok sabha election 2024
  2. पंतप्रधानांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, काही रस्त्यांवर पार्किंगवर प्रतिबंध, कोणते आहेत पर्यायी रस्ते? - Mumbai traffic update
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.