महाराष्ट्र

maharashtra

ठाणे : जिल्हा प्रशासनाच्या बंदीनंतरही नागरिकांची चौपाटीवर गर्दी

By

Published : Jun 17, 2021, 10:08 PM IST

ठाण्यातील गायमुख खाडीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

crowd of citizens at choupati in thane
ठाणे : जिल्हा प्रशासनाच्या बंदीनंतरही नागरिकांची चौपाटीवर गर्दी

ठाणे -कोरोनाचा संसर्ग कामी होत असला, तरीदेखील गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने तलाव, धबधबे आणि प्रेक्षणीय स्थळावर बंदी घातली आहे. मात्र, ठाण्यातील गायमुख खाडीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून वेळीच या गर्दीवर नियंत्रण आणले नाही, तर पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट

ठाण्यात या ठिकाणी आहे नागरिकांची गर्दी -

ठाण्यातील रेतीबंदर खाडी, गायमुख खाडी, साकेत खाडी या खाडी परिसरात बनवलेल्या चौपाट्यांवर ठाणेकरांनी या पावसाचा आनंद घेत गर्दी केली आहे. या ठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर ठाणेकर गर्दी करत आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी महानगरपालिकेने बांधलेल्या चौपाट्या जरी बंद असल्या, तरी या चौकटीच्या बाहेर ठाणेकर पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत.

हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला 28 जूनपर्यंत एनआयए कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details