महाराष्ट्र

maharashtra

कामन रोड रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरला धक्कबुकी करून रेल रोको करणाऱ्या जमावावर गुन्हा दाखल

By

Published : Sep 1, 2022, 8:16 PM IST

डोंबिवली ते बोईसर जाणारी ट्रेन ३० आगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटाने सुटून कामन रोड स्थानकात सकाळी ६ वाजून ३० मिनिटाने ३० पोहोचणे अपेक्षित होते. परंतु ट्रेन ७ वाजता म्हणजे अर्धा तास उशिरा पोहोचली. यावेळी स्थानकात असलेल्या ७५ ते १०० प्रवाशांनी रेल रोको आंदोलन करून स्टेशन मास्तर यांना धक्काबुक्की व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

case has registered against mob that stopped the train by beating station master at kaman road railway station in kalyan
कामन रोड रेल्वे स्थानकात स्टेशन मास्तरला धक्कबुकी करून रेल रोको करणाऱ्या जमावावर गुन्हा दाखल

ठाणे डोंबिवली हुन बोईसरला जाणाऱ्या ट्रेनला कामन रोड रेल्वे स्थानकात येण्यास उशीर झाल्याने स्थानकातील प्रवाशांच्या जमावाने स्टेशन मास्तरला धक्काबुकी केली. यानंतर दीड तास रेल्वे थांबवून आंदोलन करणाऱ्या जमावावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादवी कलम 353, 323, 504, 141, 149 सह भारतीय रेल्वे कायदा कलम 147 174 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

ट्रेन दीड तासानंतर पुन्हा मार्गस्थडोंबिवली ते बोईसर जाणारी ट्रेन ३० आगस्ट रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटाने सुटून कामन रोड स्थानकात सकाळी ६ वाजून ३० मिनिटाने ३० पोहोचणे अपेक्षित होते. परंतु ट्रेन ७ वाजता म्हणजे अर्धा तास उशिरा पोहोचली. यावेळी स्थानकात असलेल्या ७५ ते १०० प्रवाशांनी रेल रोको आंदोलन करून स्टेशन मास्तर यांना धक्काबुक्की व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांचे कडून जबरदस्तीने एका कोऱ्या पेपरवर ट्रेन यापुढे लवकर येईल असे लिहून घेत, धमकी देऊन बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केले होते. त्यानंतर ट्रेन दीड तासानंतर पुन्हा मार्गस्थ झाली होती. हा प्रकार घडल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालगाड्यामूळे प्रवाशी ट्रेन उशिराने प्रवाशांचा आरोपया ट्रेनला रोजच्या होणाऱ्या उशिरामुळे विद्यार्थी व प्रवाशांना मोठा त्रास होत असून मालगाड्या जाण्यासाठी स्टेशन यंत्रणा प्रवासी रेल्वे ट्रेनला रोखून धरले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून भिवंडीकरांची सुटका करण्याचे काम भिवंडी – वसई मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मार्गीकेतून होत असते. मात्र सध्या भिवंडी वसई मार्गावर येजा करणाऱ्या डोंबिवली बोईसर या लोकल ट्रेनला रोज उशीर होत असल्याने प्रवासी संतप्त झाले होते. तर प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर अवघ्या आठ रेल्वे गाड्या वेळा वेळाने सोडण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details