महाराष्ट्र

maharashtra

पिसे डॅम परिसरातून 1 कोटींहून अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त

By

Published : Dec 22, 2020, 8:44 PM IST

Updated : Dec 22, 2020, 10:29 PM IST

भिवंडी तालुक्यातील पिसे स्थळ परिसरात 1 किलो 70 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि 1 किलो 700 ग्रॅम एमडी पावडरचा साठा हस्तगत करण्यात आला.

पडघा पोलीस ठाणे
पडघा पोलीस ठाणे

भिवंडी (ठाणे) - तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या पिसे डॅम परिसरातील अमली पदार्थ विक्री करणारी तस्करांची दुकली पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. या तस्कर दुकलीकडून 1 किलो 70 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि 1 किलो 700 ग्रॅम एमडी पावडरचा साठा हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाचा बाजारात मुल्य रक्कम 1 कोटी 13 लाख 79 हजार 500 रुपये असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलीस ठाणे

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे यांच्या तक्रारीवरुन तस्कर दुकलीवर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जाहिद मोहम्मद हनीफ शेख (वय 30 वर्षे, रा. मुठवाल, भिवंडी) ईश्वर मिश्रा (वय 29 वर्षे, रा. बस्ती जिल्हा, उत्तरप्रदेश), असे अटकेत असलेल्या दुकलीचे नाव आहे.

गस्तीदरम्यान हटकल्याने तस्करीचा प्रकार उघड

टाळेबंदीमध्ये गुन्हेगारीत घट झाली होती. आता अनलॉक काळात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात उघड झाले आहे. यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनीही गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामीण भागात गुन्हेगारांच्या शोधार्थ गस्त सुरू केली. त्यातच सोमवारी (दि. 21 डिसें.) सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि भास्कर जाधव हे पोलीस पथकासह पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिसे डॅम रस्ता ते सावद नाका परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात संशयास्पद होताना पथकाला दिसले. त्यामुळे पोलिसांनी वाहनातील दोघांना हटकले असता त्यांच्या बोलण्यातून संशय वाटल्याने पोलीस पथकांनी त्याच्या वाहनांची झडती घेतली. त्यावेळी वाहनात 1 किलो 70 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि 1 किलो 700 ग्रॅम एमडी पावडरचा साठा आढळून आला. त्यासोबतच एक डिजिटल वजन काटाही पोलीस पथकाला आढळून आला.

याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात तस्कर दुकलीवर गुन्हा दाखल करून आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात हे अमली पदार्थ आरोपींनी कुठून आणले. ते कोणाला विक्री करत होते. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव करत आहेत.

हेही वाचा -वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी भगत यांची दुसऱ्यांदा निवड

हेही वाचा -ठाण्यातील वाहतुकीला ‘एलआरटी’चा पर्याय, सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Last Updated : Dec 22, 2020, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details