महाराष्ट्र

maharashtra

kalyan Rape Case : १५ वर्षीय मुलाने ९ वर्ष वयाच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या

By

Published : Dec 1, 2022, 1:24 PM IST

Updated : Dec 1, 2022, 4:05 PM IST

१५ वर्षीय मुलाने नऊ वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार ( kalyan rape case ) करून तिची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक ( killed 9 year Old Minor Girl ) घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.

kalyan rape case
kalyan rape case

ठाणे :१५ वर्षीय मुलाने नऊ वर्ष अल्पवयीन मुलीवर ( kalyan rape case ) अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या ( killed 9 year Old Minor Girl ) केल्याची धक्कादायक घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे.

कल्याण बलात्कार प्रकरण

१५ वर्षीय मुलाचा नऊ वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून :१५ वर्षीय मुलाने नऊ वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एसटी आगरच्या लगत असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हत्येसह अत्याचार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.

अल्पवयीन आरोपीची ओळख पटवली :कल्याण पश्चिम परिसरातील एसटी आगरच्या लगत असलेल्या एका हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात आज पहाटेच्या सुमारास ९ वर्षीय मुलीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान , पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तासाभरातच अल्पवयीन आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याचा शोध घेऊन त्याला स्टेशन परिसरातून ताब्यात घेऊन त्याला महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस गस्त वाढविण्याची मागणी :पोलीस चौकशीतुन या अल्पवयीन आरोपीने सांगितले कि, मुलीच्या वडिलांनी मला काही दिवसापूर्वी मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्या मुलीवर अत्याचार करून तिची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने पोलिसांना दिली. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनचा परिसरात २४ तास नागरिकांची ये-जा असताना असा गंभीर गुन्हा घडल्याने पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.

Last Updated : Dec 1, 2022, 4:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details