महाराष्ट्र

maharashtra

'माझी वसुंधरा अभियान'; सोलापूर महानगरपालिका शहरात लावणार एक लाख झाडे

By

Published : Jun 6, 2021, 8:29 AM IST

Updated : Jun 6, 2021, 10:55 AM IST

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत एक लाख वृक्ष येत्या पावसाळ्यात लावण्यात येणार असून ती झाडे जतन करण्यात येणार आहे.

solapur
solapur

सोलापूर-महानगरपालिका अंतर्गत माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रमा अंतर्गत 5 जुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर महानगरपालिका शहरात एक लाख झाडांचे वृक्षारोपण करणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. पर्यावरण संवर्धनकरीता नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर भर द्यावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. यासाठी इलेक्ट्रिक वाहन वापरास चालना देण्याकरीता प्रायोगिक तत्वावर सोलापूर महानगरपालिका परिसरात इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन बसविण्यात आले आहे. या चार्जिंग स्टेशनचे उदघाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपआयुक्त धनराज पांडे, उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे,चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिका शहरात लावणार एक लाख झाडे


सोलापूर शहरात एक लाख वृक्षरोपण करणार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत एक लाख वृक्ष येत्या पावसाळ्यात लावण्यात येणार असून ती झाडे जतन करण्यात येणार आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये सोलार सिस्टिमचा वापर व्हावा तसेच लोकांनी इलेक्ट्रिक बाइक व कारचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले. त्यासाठी महापालिकेच्यावतीने शनिवारी 5 जून रोजी प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्या आवारात दोन ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभे करण्यात आले आहे.

शहरात लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावतील
सोलापूर शहर महानगरपालिका लवकरच 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणार आहे. पेट्रोलपेक्षा कमी खर्च इलेक्ट्रिक वाहनांना होतो. तसेच उत्पन्नात देखील वाढ होते. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील नागरिकांनी आपल्या घरासमोर प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व ते झाड जतन करावे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पर्यावरण संवर्धनाकरीता मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोफत चार्जिंग स्टेशन
महापालिकेच्यावतीने इलेक्ट्रिकल वाहनांसाठी महानगरपालिका आवारात चार्जिंग स्टेशन उभे करण्यात आले आहेत. सोलापुरातील ज्या नागरिकांकडे इलेक्ट्रिक दुचाकी वाहन आहे. अशा नागरिकांसाठी हे चार्जिंग स्टेशन मोफत ठेवण्यात आले आहे. तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आव्हान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी केले.

Last Updated : Jun 6, 2021, 10:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details