महाराष्ट्र

maharashtra

मास्क न वापरणाऱ्या सहाजणांकडून दंड वसूल, करमाळा नगरपरिषदेची कारवाई

By

Published : Apr 22, 2020, 10:07 AM IST

प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नगरपरिषदेने दंडात्म्क कारवाई सुरु केली आहे. शहरातील सुभाष चौक आणि बस स्टँड परिसरात मास्क न वापरता फिरणाऱ्या सहा नागरिकांवर दंडात्म्क कारवाई करुन 1 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

मास्क न वापरणाऱ्या सहाजणांकडून दंड वसूल
मास्क न वापरणाऱ्या सहाजणांकडून दंड वसूल

सोलापूर - मास्क न वापरता फिरणाऱ्या सहा नागरिकांवर करमाळा नगरपरिषदेकडून कडक दंडात्म्क कारवाई केली गेली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, वारंवार सूचना देऊनही नागरिक विना मास्क घरातून बाहेर पडत आहेत.

प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नगरपरिषदेने दंडात्म्क कारवाई सुरू केली आहे. शहरातील सुभाष चौक आणि बस स्टँड परिसरात मास्क न वापरता फिरणाऱ्या सहा नागरिकांवर दंडात्म्क कारवाई करुन 1 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी वीणा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक डी. डी. देशमुख, आरोग्य् निरिक्षक जब्बार खान, लिपिक मल्हारी चांदगुडे, रावसाहेब कांबळे, करमू साळवे यांनी ही कारवाई केली.

दंडाची रक्कम -

करमाळा शहरामध्ये फिरताना मास्क न लावणे - 200 रुपये

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - 500 रुपये

सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन - 200 रुपये

विनाकारण रस्त्यावर फिरणे - 200 रुपये

वेळे व्यतिरिक्त दुकाने उघडणे - 200 रुपये

दुकानासमोर गर्दी असणे - 200 रुपये

दुकानासमोर वर्तुळ नसणे - 200रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details