महाराष्ट्र

maharashtra

Nana Patole : ...म्हणून राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

By

Published : Jun 23, 2023, 12:50 PM IST

डॉ. झाकीर नाईक यांची देणगी आल्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये गेले असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच भाजप पक्षात प्रवेश केल्यावर त्यांना गुजराती वॉशिंग मशीनमधून धुवून काढले असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat

सोलापूर - राधाकृष्ण विखे पाटील पूर्वी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. डॉ. झाकीर नाईक यांची देणगी आल्यामुळेच ते भाजपमध्ये गेले, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विखे पाटलांवर केली आहे. नाना पटोले म्हणाले की, भाजपमध्ये गेल्यावर ते वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढतात. त्यांनी गुजरातचे वॉशिंग पावडर देखील आणले आहे, असे त्यांचेच नेते सांगतात.

राधाकृष्ण विखे पाटील देशद्रोहींकडून पैसे घेतले किंवा त्यांनी भ्रष्टाचार केला तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. कारण त्यांना गुजरातमधून आणलेल्या गुजराती वॉशिंग मशीनमध्ये गुजराती पावडरने धुतले आहे - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

पाटणात विरोधी पक्ष नेत्यांची बैठक -काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष आहेत. नितीश कुमार समन्वयक असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे नेतृत्व सोनिया गांधी करत आहेत. बीजेपीच्या विरोधातील जी सर्व लोक आहेत त्यांना एकत्रित करण्यासाठी ही आजची बैठक आहे. त्यामुळेच भाजप विरोधात बैठक आयोजित केली आहे. देशामध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रचंड चिड आहे. 2014 आणि 2019 मध्ये ज्या घोषणा केल्या होत्या त्याची पूर्तता झालेली नाही. उलट देश विकून चालवला जात आहे. देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवत आहेत. भाजप ही व्यवस्थाच या लोकशाही व्यवस्थेमध्ये नसली पाहिजे, असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

ईडी कारवाई हे महाराष्ट्रासाठी नवे नाही - सुरज चव्हाण यांवर झालेली ईडीची कारवाई हे महाराष्ट्रासाठी आता नवीन राहिलेले नाही. मोदींचे सरकार हे ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करत आहे, हे लपलेले नाही. जे कोणी विरोध करतील त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआय चौकशी लावू, त्यांच्यावर दबाव आणू, त्यांच्यावर कारवाई करू, त्यानंतर त्यांना आमच्या पक्षात घेऊ आणि स्वच्छ करू ही भाजपची भूमिका आहे आणि ती लपलेली नाही. पण मला वाटत नाही या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरे दबावात येतील. या सगळ्यांच्या पुढे जाऊन ते यावर मात करतील असा आमच्या सर्वांचा विश्वास आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा -

  1. Patna Opposition Meeting : विरोधी पक्षांच्या बैठकीला कोणते नेते आले? राहुल गांधींनी सुरुवातीलाच थेट सांगितले....
  2. Nana Patole criticized CM: भ्रष्टाचाराचे पैसे मोजण्यासाठी सुट्टी घेतली- नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
  3. Opposition Parties Meeting Patna: विरोधी पक्षांच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? शरद पवारांनी दिले उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details