महाराष्ट्र

maharashtra

Ketaki Chitale Post Controversy : सदाभाऊ खोतांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा, केतकी चितळेचे केले होते समर्थन

By

Published : May 16, 2022, 5:10 PM IST

Updated : May 16, 2022, 8:51 PM IST

रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ( Sadabhau Khot Statement On Ketaki Chitale ) केतकी चितळेचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सोलापुरातील राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी अचानकपणे सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे येऊन सदाभाऊ खोत ( NCP Mess In Front Of Sadabhau Khot ) यांच्या समोर धिंगाणा घातला आहे.

Ketaki Chitale Post Controversy
Ketaki Chitale Post Controversy

सोलापूर - शरद पवार यांच्यावर ( ketaki Chitale Post On Sharad Pawar ) केतकी चितळेने केलेल्या पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा गोंधळ उडाला आहे. केतकी चितळे यांना ठाणे पोलिसांनी ( Thane Police Arrest Ketaki Chitale ) ताब्यात घेतले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ( Sadabhau Khot Statement On Ketaki Chitale ) केतकी चितळेचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सोलापुरातील राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी अचानकपणे सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे येऊन सदाभाऊ खोत ( NCP Mess In Front Of Sadabhau Khot ) यांच्या समोर धिंगाणा घातला आहे. यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रतिक्रिया

या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ -सदाभाऊ खोत हे सोमवारी दुपारी सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, जुबेर बागवान, प्रतीक पवार, मकरंद शिवशेट्टी, मुसा अत्तार, इरफान शेख, युवराज राठोड, सरफराज बागवान, तौकिर शेरी, सादिक कुरेशी यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदुंगा सहित शासकीय विश्रामगृहात प्रवेश केला. सदाभाऊ खोत हे ज्या रूममध्ये बसले होते, त्याठिकाणी जाऊन त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

सदाभाऊ खोतांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न -राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते टाळमृदंग वाजवत 'हे पांडूरंगा सदाभाऊ खोत यांना सद्बुद्धी दे', असे म्हणून कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा समोरच निषेध नोंदवत त्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

हेही वाचा -Woman injured in Guptkashi : डोक्यात दगड पडून केदारनाथ यात्रेत मुंबईकर महिला जखमी, एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल

Last Updated :May 16, 2022, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details