महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाकाळातील अपुऱ्या आरोग्य सुविधांचा बोजवारा; पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी बदलाची मागणी

By

Published : May 6, 2021, 8:36 PM IST

Updated : May 6, 2021, 10:10 PM IST

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर असल्याचा आरोप पालिकेतील माजी गटनेता सुरेश पाटील यांनी केला आहे. कोरोनाची परिस्थिती लवकर आटोक्यात न आल्यास जिल्हाधिकारी व पालिका आयुक्त बदलीसाठी

सुरेश पाटील
सुरेश पाटील

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर असल्याचा आरोप पालिकेतील माजी गटनेता सुरेश पाटील यांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणली गेली नाही तर या दोन मुख्य अधिकाऱ्यांविरोधात ठराव मंजूर करून अधिकारी बदलाची मागणी करणार असल्याची माहिती सुरेश पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. रुग्ण वाढीत अव्वल असलेल्या देशातील 15 जिल्ह्याची यादी केंद्राने जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील दोन जिल्ह्यांचे नाव आहे. सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

बोलताना नगरसेवक पाटील

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एप्रिल व मे दरम्यान कोरोनाग्रस्तांची मोठी वाढ

सोलापूर शहर व जिल्ह्यात 13 ते 29 एप्रिल काळात 8 हजार 863 रुग्ण वाढले. 20 ते 26 एप्रिल दरम्यान 11 हजार 401 रुग्ण वाढले तर 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान 13 हजार 864 रुग्ण वाढले. रुग्ण झपाट्याने वाढत गेल्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा -सोलापुरात कोरोनाची परिस्थिती भयावह; वृद्ध महिलेचा उपचाराअभावी रिक्षात मृत्यू

Last Updated : May 6, 2021, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details