महाराष्ट्र

maharashtra

30 हजारांची लाच मागितली; पोलीस नाईकविरुद्ध गुन्हा दाखल

By

Published : Jun 2, 2021, 12:28 PM IST

मंगळवेढा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वाळूतील पकडलेल्या ट्रकवर कारवाई केली होती. त्या कारवाईमध्ये पकडलेल्या ट्रॉलीवर कारवाई न करणे आणि वाळूचा हप्ता वरिष्ठांना देणे, अशी बतावणी करून पोलिस नाईक संतोष चव्हाण यांनी तक्रारदाराकडे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

case filed on manghalvedha police station police naik over bribe for 30 thousand
30 हजारांची लाच मागितली; पोलीस नाईकविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढा (सोलापूर) - पकडलेली ट्रॉलीवर कारवाई न करता सोडण्यासाठी व वाळू वाहतुकीचा हप्ता साहेबांना देण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. लाच मागण्याच्या संदर्भातील मोबाईल रेकॉर्डिंगच्या सहाय्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न -

मंगळवेढा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी वाळूतील पकडलेल्या ट्रॉलीवर कारवाई केली होती. या ट्रॉलीवर कारवाई न करणे आणि वाळूचा हप्ता वरिष्ठांना देणे, अशी बतावणी करून पोलिस नाईक संतोष चव्हाण याने तक्रारदाराकडे तीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यासंदर्भात तक्रारदाराने 13 मेला सातारा लाचलुचपत कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सदर तक्रारदाराच्या जबाब व फोनवरील संभाषणावरून संतोष चव्हाण यांनी आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निष्पन्न झाले आहे. त्या भाषणामध्ये संतोष चव्हाण यांनी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी, पोलीस नाईक संतोष चव्हाण याच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा लाचलुचपत पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास लाचलुचपत पथकाच्या पोलीस निरीक्षक कविता मुसळे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details