महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 43 लाख रुपयांचा दंड वसूल

By

Published : Jun 10, 2021, 8:47 PM IST

Updated : Jun 10, 2021, 9:12 PM IST

पंढरपुर तालुक्यात कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलीस प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून कारवाई केली होती. यामध्ये शहर व ग्रामीण भागातील मास्क न घालणाऱ्या (8600) नागरिकांकडून 43 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती, विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 43 लाख रुपयांचा दंड वसूल
कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 43 लाख रुपयांचा दंड वसूल

पंढरपूर - तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर नियमावली तयार केली. त्या नियमावलीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यात सगळीकडे अंमलबजावणी केली. एक मार्चपासून पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना संबंधीच्या नियमांचे जे पालन करत नाहीत, त्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाकडून दंड आकारण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने 67 लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती, विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई, 43 लाख रुपयांचा दंड वसूल

'67 लाख रुपयांचा दंड वसूल'

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलीस प्रशासनाने गेल्या तीन महिन्यांपासून दंडात्मक कारवाई केली होती. यामध्ये शहर व ग्रामीण भागातील मास्क न घालणाऱ्या (8600) नागरिकांकडून 43 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून एक लाख रुपये दंड वसूल केला आहे. तसेच, सुरक्षित अंतर न पाळल्याने चार हजार जणांकडून 4 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील नियमाचा भंग करणाऱ्या दुकानदारांकडून सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. एकूण 67 लाख रुपयांचा दंड गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस प्रशासनाकडून वसूल करण्यात आला आहे.

'कोरोना नियमांचे पालन न केल्याने गुन्हे दाखल'

कोरोनाचा संसर्ग शहरासह ग्रामीण भागात वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदी लागू केली होती. या संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या (4400) जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे पालन न केलेल्या (219) जणांवर थेट गुन्हे दाखल करत, कारवाई केली होती. त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यात मोठी मदत झाल्याची माहिती, विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 10, 2021, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details